अनिल भाईदास पाटील हे पुनर्वसन मंत्री झाल्या बरोबर नंदुरबारचे पालकमंत्री देखील झाले, पण मंत्रीपदाचे आनंदात त्यांचे पक्ष संघटने कडे दुर्लक्ष झाले, ज्या जिल्ह्यातील पालकमंत्री होते नेमकी तेथिल जागा राष्ट्रवादीला गमवावी लागली, खान्देशात ते स्वतः मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले, परंतु राष्ट्रवादीचा खान्देशात सफाया झाला.. याची शिक्षा म्हणून असेल नक्की झालेले मंत्रीपद तर गेलेच पण प्रतोद म्हणून झालेली घोषणा देखील रद्द झाली. कार्यकर्ते व समर्थक नाराज झाले.
मात्र आता राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष व खानदेशचे प्रभारी म्हणून त्यांचेवर मोठी जबाबदारी टाकण्यात आली असल्याने अमळनेर सह खान्देशात अनिलदादा यांचे समर्थक खुश आहेत.
अनिलदादा देखील कोवळ्या वयापासून पक्षीय राजकारणात असल्याने ते या परीक्षेत पास होतीलच व लवकरच पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळवतील अशी खात्री आहे.
दादा, आपल्यावर पडलेल्या नव्या जबाबदारी बद्दल अभिनंदन, यशस्वी होऊन पुन्हा मंत्री व्हावे या बद्दल शुभेच्छा.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments