श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिरासाठी सतत योगदान देणार-आ.अनिल पाटील


अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथे भक्तनिवाससह विविध विकास कामांचे भूमिपूजन


अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील श्री. चक्रधर स्वामी महाराज मंदिरातील महंतबाबांचा मला नेहमीच आशीर्वाद राहिला असून माझी देखील या देवस्थांनावर मोठी श्रद्धा आहे. यामुळे मंदिर परिसरात विकासासाठी माझे नेहमी
 योगदान राहील अशी ग्वाही माजी मंत्री तथा आ.अनिल भाईदास पाटील यांनी रणाईचे येथे श्री चक्रधर स्वामी महाराज मंदिरात विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी दिली.
रणाईचे येथे श्री.चक्रधर स्वामी महाराज मंदिर येथे भक्तनिवास बांधकाम करणे 40 लाख रुपये, रणाईचे गावासाठी रस्ता कॉंक्रिटीकरण करणे 10 लाख रुपये, ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे 25 लाख रुपये असे एकूण 75 लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन आमदार पाटील यांच्या हस्ते तर परमपूज्य महंत बिडकर बाबा, परमपूज्य महंत सर्वज्ञ बाबा, मा.जिल्हा परिषद सदस्य जयश्री अनिल पाटील, माजी नगरसेवक भाईदास महाजन, प्रा.सुरेश पाटील, जे.व्हि. पाटील, हेमंत पाटील, प्रदीप इंदुलकर, प्रदीप पाटील, विवेक पाटील, संजू पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या वेळी आमदारांनी श्री चक्रधर स्वामी आश्रमासाठी निधी कमतरता भासु देणार नाही, प्रत्येक महोत्सवात मी सहभागी होत असतो या शिवाय रणाईचे येथे रस्त्यांसाठी व गावातील विविध विकास कामांसाठी भविष्यात अशीच भरीव निधींची तरतूद करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ व भाविक भक्त उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments