अमळनेर मिळचाळ परिसरात नाद खुळा उपक्रम!
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट हा सर्वांनी मल्टिप्लेक्स थिएटर मध्ये जाऊन बघावा अशी सर्वांची इच्छा... पण सर्वाना परवडणार का? आपल्या
मिलचाळ मधील बरेच लोकांनी हा चित्रपट बघितला नसल्याने आपल्या चाळ मधील सर्वाना ही संधी उपलब्ध करून देण्याची कल्पना..!
तरुण सरसावले व जणू मल्टिप्लेक्स मध्ये आपण चित्रपट बघत आहोत... अशी व्यवस्था करण्यात आली हे सर्व नियोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यायाम शाळा मिल चाळ व श्रीकृष्ण मित्र मंडळ मिल चाळ येथील सर्व तरुण व बालकांनी केले. अनेक पालकांचे अनमोल सहकार्य लाभले.
दर्जेदार नियोजन करून छावा चित्रपट मल्टिप्लेक्स सारखा दाखवला यापुढे पण अशाच प्रकारे कार्य होत राहो. अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कार्याबद्दल कौतुक करावे तेवढे कमीच आहे...सर्व मिलचाळकर रहिवासी कडून आयोजक सर्वांचे अभिनंदन व आभार मानण्यात आले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440
0 Comments