यशस्वी गणेश शिंगारे सह द्रो.रा.कन्याच्या सात विद्यार्थिनी राष्ट्रीय स्काऊट गाईड शिबिरात!!

खान्देश शिक्षण मंडळ संचलित जळगांव जिल्ह्यातील एकमेव डी. आर. कन्या शाळेने राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट गाईड जांबोरीमध्ये नोंदवला सहभाग.

अमळनेर येथील द्रो रा कन्या विद्यालयाच्या आठ विद्यार्थिनींची राष्ट्रीय स्तरावरील स्काऊट गाईड जांबोरीसाठी तामिळनाडू राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील जांबोरी येथे निवड झाली होती. 
यात कार्तिकी गणेश लांडगे, यशस्वी गणेश शिंगारे, अनन्या राहूल पाटील, लिनाली प्रमोद ठाकरे, तनीषा संदीप बडगुजर, उन्नती किशोर शिंदे, चैताली सचिन शिंदे, पूर्वा गोकुळ पाटील यांनी सहभाग सहभाग घेऊन यशस्वीपणे सर्व प्रशिक्षण पूर्ण करून विशेष प्रविण्य प्राप्त केले. या कामी त्यांना श्रीमती. वाय. एम. पाटील, उपमुख्याध्यापक विनोद कदम यांचे विशेष मार्गदर्शन लाभले..
या स्काऊट गाईड जांबोरीसाठी शालेच्या शिक्षिका श्रीमती. वाय. एम. पाटील मॅडम यांनी विद्यार्थिनींना अतिशय उत्तम मार्गदर्शन केले. 
त्या मुलींना त्यांच्याबरोबर जाऊन जांबोरीमधील विविध उपक्रम, साहसी खेळ, शिबिरे, सामाजिक कार्य आणि नेतृत्व कौशल्यांच्या प्रशिक्षणाने मुलींची सर्वांगीण व्यक्तिमत्त्वविकास साधला.

मुख्याध्यापिका सुर्यवंशी आणि श्री. विनोद कदम यांच्या मार्गदर्शनाखाली डी. आर. कन्या शाळेतील विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी उत्कृष्ट कार्य केले जात आहे. त्यांचे प्रेरणादायक मार्गदर्शन विद्यार्थिनींना सदैव उत्कृष्टतेची कास धरण्यासाठी प्रेरित करत आहे.
आठ दिवसांच्या जांबोरीमध्ये मुलींनी शारीरिक क्षमता, साहसिक कौशल्य, टीमवर्क, मानसिक क्षमता आणि नेतृत्व कौशल्य यांचे विश्लेषण केले. मुलींना अवघड रस्त्यांवर चालण्याचे, चढाई करण्याचे, जंगली प्रवासांचे आणि विविध साहसी उपक्रमांचे प्रशिक्षण दिले गेले. त्याचबरोबर शालेय जीवनात उपयोगी पडणाऱ्या विविध जीवन कौशल्यांचा अभ्यास केला गेला. व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे मिळाले.
जांबोरी समारंभाची कार्यवाही अंतिमत: मुलींनी यशस्वीरित्या पूर्ण केली आणि शेवटी विशेष प्रविण्य प्रमाणपत्र प्राप्त करून आल्या. त्यांच्या यशामुळे शाळेचे नाव मोठे झाले आहे आणि शाळेच्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन होत आहे.
जांबोरीनंतर, बाविस्कर सर यांनी मुलींना पुढील शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रातही यश मिळवण्याची प्रेरणा दिली.
या यशाबद्दल शाळेच्या शिक्षक-शिक्षिकांनी अभिमान व्यक्त करून अभिनंदन केले. 
यशस्वी शिंगारे ही सर्पमित्र गणेश शिंगारे यांची कन्या असून पुरोगामी परिवार, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाने कौतुक केले.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments