अतिवृष्टीमुळे बाधीत तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार ४४ कोटी ३८ लाखांची मदत.

राज्य शासनाची मंजुरी, जिल्ह्यात अमळनेर तालुक्याला सर्वाधिक मदत -आ.अनिल पाटील

 मागील वर्षी खरीप हंगाम अतिवृष्टीमुळे पूर्ण वाया गेल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी ४४ कोटी ३८ लाखांच्या मदतीला शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय नुकताच प्रसिद्ध झाला असल्याची माहिती माजी मंत्री तथा आमदार अनिल पाटील यांनी दिली. विशेष म्हणजे जळगाव जिल्ह्यात सर्वाधिक मदत अमळनेर तालुक्याला मिळाली आहे.
याबाबत महाराष्ट्र शासन व महसूल व वन विभागाचे आदेश 18 व 25 फेब्रुवारी रोजी प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. अतिवृष्टीमुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम झाला होता, विशेषत: कापसाच्या पिकाला मोठा फटका बसला होता. याशिवाय इतर पिकेही बाधित झाली होती,परतीच्या पावसामुळे कापूस काढणीवर असतानाही शेतकऱ्यांच्या हातातोंडाचा घास हिरावला गेला होता. तालुक्यातील ५३०६४ शेतकऱ्यांची ३२५६९.७८ हेक्टर शेतजमीन प्रभावित झाली होती. 
यासंदर्भात तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी त्वरित पंचनाम्याचे आदेश देऊन मदतीसाठी शासन दरबारी योग्य तो पाठपुरावा केल्याने अवघ्या सहाच महिन्यात या शेतकऱ्यांना एकूण ४४ कोटी ३८ लाख ५९ हजार रुपयांची भरपाई मिळणार आहे. तर संपूर्ण जिल्ह्यात देखील बाधित शेतकऱ्यांना मोठी मदत मिळणार आहे.
लाभार्थी शेतकरी बांधवांनी आमदार अनिलदादा यांचे आभार व्यक्त केले आहेत. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments