मंगळ मंदिर परिसरात औषधी अमलताश तथा बहावा असा शेंगांनी लदला आहे.

 हिवाळ्यात पर्णहीन असलेले हे झाड सोनसळी फुलांनी बहरते, त्याचा पिवळा सोनेरी रंग वेड लावतो.. 
कॅशिया फिस्तूला हे  शास्त्रीय नाव असलेला अत्यन्त औषधी गुणधर्मी वृक्षास मराठीत बहावा किंवा कर्णिधार हिंदीत अमलताश तर संस्कृत मध्ये आरग्वद असे संबोधले जाते. 
सध्या मंगळ मंदिर परिसरत तीन ते 4 बहावा वृक्ष असून शेंगांनी लदले आहेत. बहावाच्या शेंगांचा गर सारक औषधी तथा कावीळ रोगात उपयुक्त असतो, तंबाकू ला स्वाद यावा म्हणूनही बहावा शेंगाचा वापर होतो.. या झाडाची साल कातडे कमावण्यासाठी उपयुक्त असते. 
या शेंगा माकडे, कोल्हे, अस्वले, पोपट आवडीने खातात. 
मंगळ मंदिरात अनेक औषधी वृक्ष आहेत त्यात बहावा असा शेंगांनी लदलेला पाहून पारख असलेले व गुणग्राहक लोक खुश होऊन जातात. पडलेल्या शेंगा जुन्या जाणत्या व्यक्ती आठवणीने घेऊन जातात.
-लोकहिवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments