माझे सोबत राहण्याचे नाटक करून अनेकांनी विरोधी पक्षाला मदात केली. मात्र काही प्रामाणिक नेते व कार्यकर्ते सोबत होते हे निश्चित..
पण काही स्वार्थी मतमोजणी सुरू असताना 'त्या' उमेदवाराचे सोबत होते, 'ते' विजयी होताच हे हार तुरे घेऊन अभिनंदन करायला गेले.. माझे साधी विचारपूस करायला देखील आले नाहीत, मतदार संघात कुठेही यांनी मनापासून काँग्रेसचा प्रचार केला नाही असे सांगतानाच डॉ अनिल शिंदे भावुक झाले होते.
ते म्हणाले की हे लोक वरून आरोप करतात की मी पक्ष सोडायला निघालो.. मी आयुष्यभर काँग्रेस चा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करीत आलो, म्हणून मला तिकीट मिळाले, पण स्थानिक नेत्यांनी साथ दिली नाही हे दुःख आहे.
हेच स्वतः काँग्रेसचे सांगून इतरांचे पंगतीत बसले या सह मी अनेक पुरावे वरिष्ठ लोकांना दिले आहेत.
माझे सत्य मांडणी बद्दल मिरच्या झोंबल्या म्हणून माझे बद्दल पत्रकार परिषद घेणाऱ्या नेत्यांनी प्रचारात लक्ष घातले असते तर निकाल वेगळा लागला असता.
जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार याने 2 लाख रुपये घेतले. वरिष्ठ नेते पार्ट्या व दारुची मागणी करीत होते, अत्यंत बिझी शेड्युल असताना यांचे लाड पूर्ण करीत मला नाकी नऊ आले होते असा गंभीर आरोप देखील डॉ अनिल शिंदे यांनी केला.
डॉ अनिल शिंदे यांचे या आरोपात तथ्य असल्याचे जुने निष्ठा असलेले अनेक लोक सांगत आहेत..
आता डॉ शिंदे यांचे वर आरोप करणारे खंडन करतील का? प्रदीप पवार याने 2 लाख रुपये घेतले असा जाहीर आरोप करणारे डॉ शिंदे यांचे खंडन प्रदीप पवार करेल का? असे अनेक प्रश्न काँग्रेस कार्यकर्ते व सामान्य जनतेस पडले आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments