रोज तुमच्या आरत्याच म्हणायच्या का?

एक बातमी टाळली किंवा विरोधात गेली की तुम्ही तोंड वाकडे का करायचे? 
समस्त स्वाभिमानी पत्रकार बांधवांचे वतीने कैफियत. 
आम्ही राजकीय, सामाजिक, बिगर राजकीय अशा अनेकांच्या बातम्या आल्या की प्राधान्य देऊन प्रसिद्ध करतो.. 
अनेकदा बातम्यांमुळे वैर अंगावर घेतो, जीव धोक्यात घालून महत्त्वाचे वृत्त वाचकांना देतो. आमची कदर होत नाही.. 
चांगले लिहिले, तुमची आरती म्हटली की खुश आणि एखादी बातमी प्रसिद्ध केली नाही किंवा विरोधात केली की तुमचे तोंड वाकडे का व्हावे? 
कायम तुमचे झोरे उचलावे, तुमचे काम झाले हारला जिंकलात की आम्हाला वाऱ्यावर सोडायचे, फोन देखिल घेत नाहीत.. तुमच्याच आरत्या म्हणाव्या हा हेका का? 
तुम्ही बरोबर असता तेंव्हा आम्ही सोबतच असतो पण चुकलात किंवा तुमचे विरोधकाने उत्तर दिले असेल तर ते का प्रसिद्ध करू नये?  
चालणार नाही! 
जे मिंध्ये असतील लाचार असतील असे लोक गातील आरत्या पडतील तुमच्या पायात...पण स्वाभिमान शाबूत असलेले लोक मात्र 
"हंस: श्वेतो बक: श्वेतो, को भेदो बक-हंसयोः। नीर-क्षीर विवेके तु, हंसः हंसो बको बकः"
या न्यायाने जगतील. 
विनंती अशी की, कुणाची बातमी आली नाही, विरोधकांची छापली, आमचा होता आता परका झाला, असे म्हणू नये.. 
तुमचे कौतुक करतो तसे जेंव्हा चुकाल तेंव्हा टीका करायचा देखील अधिकार आमचा आहेच! 
-लोकहिवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments