अमळनेरात राजमाता अहिल्याआईंचे भव्य स्मारक उभे राहणार!

राजमाता अहिल्याआईंना अभिवादन करून लगेच कामाला सुरुवात!! 
येथील आदित्य पेट्रोल पंप या ठिकाणी मनोहरनाना पाटील यांचे पुढाकाराने झालेल्या अभिवादन सभेत 2 महत्वपूर्ण ठराव करण्यात आले.. टाकरखेडा अमळनेर रस्त्यावर राजमाता अहिल्याआई यांचे काळातील पाय विहीर आहे.. निवृत्त पोलीस अधिकारी हिरामण कंखरे यांनी हे सांगताच या ठिकाणी भव्य स्मारक उभे करण्याचा ठराव करण्यात आला. तसेच गलवाडे रस्त्यावर सिंहगड अपार्टमेंट जवळील चौकास ना.धो. महानोर चौक असे नामकरण करावे असा ठराव पारित झाला. 
तातडीने सायंकाळी पाय विहिरींची पाहणी करून आज कामास सुरवात देखील करण्यात आली आहे. 
या वेळी मनोहर पाटील, हिरामण कंखरे, प्रा अशोक पवार,बन्सीलाल भागवत, हरचंद लांडगे, धनंजय सोनार, अरुण देशमुख आदी उपस्थित होते. 
अभिवादन सभेला मनोहर पाटील, प्रा अशोक पवार, अरुण देशमुख, हिरामण कंखरे, वसुंधरा लांडगे, गोकुळ आनंदा पाटील, आनंदा धनगर, महेश पाटील, भूषण भदाणे, धनंजय सोनार, ऍड. तिलोत्तमा पाटील, अशोक बाजीराव, भार्गवी पाटील, शाहू पाटील, आदित्य निकम, नंदिनी पाटील, ललित पाटील, आर्यन पाटील, प्रा राहुल निकम, ऍड शकीब काझी, प्रा एस एस पाटील आदी उपस्थित होते. 
राजमाता अहिल्याआई यांचे भव्य स्मारक उभारणी काम आज सुरू झाले असून अमळनेर शहरा पासून हाकेच्या अंतरावर वर्षोनुवर्षे दुर्लक्षित असलेली जिवंत पाणी असलेली पाय विहीर चर्चेत आली आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments