एकाच गटाचे, युतीचे असलेल्या खासदार स्मिता वाघ व आमदार अनिल भाईदास पाटील यांच्यात पाडळसरे धरण वादात चांगलीच जुंपली आहे..
केंद्रीय जल विभागाची मान्यता मिळाली म्हणून आ. अनिल पाटील व त्यांचे समर्थकानी जल्लोष केला, त्यात खासदार स्मिता वाघ यांचा कोठेही उल्लेख नहोता..
आज स्मिता वाघ यांचे समर्थकानी जारी केलेल्या व्हिडीओ व बातमीत आ. अनिल पाटील यांचा कोठेही उल्लेख नहोता..
याचा अर्थ ही श्रेय वादाची लढाई असून आमदार व खासदार यांच्यातील सुंदोपसुंदी आहे का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.
या बाबत आ.अनिलदादा यांना विचारले असता त्यांनी सांगितले की,
'मी पाडळसरे धरणासाठी पाठपुरावा करून वेडा होत चाललो आहे.. कुणी श्रेय घ्यावे हे ज्याचे त्याने ठरवावे!' तारीखवार पाठपुरावा व कागदपत्रे आपल्याकडे आहेत हे देखील आ. पाटील यांनी सांगितले.
स्मिताताई खासदार आहेत, त्यांनी देखील पाठपुरावा केला असेल असेही आ.अनील पाटील यांनी
लोकहितवादीशी बोलताना सांगितले.
खासदार स्मिता वाघ यांचेशी संपर्क होऊ शकला नाही!
पण, समविचारी व युतीत असलेल्या दोघांनी पाडळसरे धरणा बाबत श्रेय घेण्या साठी जी धावपळ चालवली आहे ती चर्चेचा विषय झाली आहे हे नक्की!
कदाचित उद्या
'आम्ही मिळून या प्रकल्पासाठी धावपळ केली, आमच्यात कुणी फूट पाडू शकत नाही, आम्ही युती धर्म पाळू असे दोघांचे वतीने जाहीर होईल !
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार



0 Comments