खासदारांपेक्षा आमदार ठरले सरस.. पंचक्रोशीतील जनता करतेय कौतुक!

माध्यमातही अनिलदादा यांनाच मोठा लीड!!
सतत पाठपुरावा व पायपीट केल्याने पाडळसरे धरणाची गाडी रुळावर येत चालली आहे आणि त्या परिश्रमाचे फलित म्हणून दिल्ली काबीज करण्यात यश मिळाले, मंत्री सी आर पाटील व संबंधित सर्वांनी माझे तळमळ व जिद्द पाहून सकारात्मक प्रतिसाद दिला असे अनिल पाटील यांनी सांगितले. 
या साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उपमुख्यमंत्री अजितदादा व एकनाथ शिंदे, गिरीश महाजन आदी अनेकांचे सहकार्य लाभले. 
पाडळसरे ही हजारो लोकांच्या आयुष्याचा कायापालट करणारी योजना आहे व ती पूर्ण व्हावी म्हणून आपण सतत आग्रही राहू असे देखील अनिलदादा यांनी स्पष्ट केले. 
स्मिता वाघ व अनिल पाटील हे युती धर्माचे पालन करू असे म्हणत असतात, त्यात अनिलदादा यांचे ताईंना मोठे मताधिक्य मिळवून देण्यात योगदान कुणी नाकारणार नाही. आपण हे काम करून आणले म्हणून जनता आपले कौतुक करीत आहे, असे दादांनी सांगितले. 
प्रसिद्धी माध्यम देखील अनिल पाटील यांचे पाठीशी उभे राहिले.. याचे एक कारण अनिल पाटील यांचे पाडळसरे धरणा बाबतचे प्रयत्न त्यांना माहीत होते, दुसरे म्हणजे अनिल पाटील सतत प्रसिद्धी माध्यमांच्या संपर्कात राहतात.. आणि स्मिता ताई प्रसिद्धी माध्यमांच्या 'अडचणी' कधीच समजून घेत नाहीत! 
सर्व फुकटात मिळत नाही लोकांच्या नेहमी संपर्कात राहावे लागते, त्यांच्या अडचणी सोडवाव्या लागतात, हे जो जाणतो त्याला जनता व माध्यमे देखील प्रतिसाद देतात हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले आहे.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments