सकाळी 7 च्या सुमारास येणाऱ्या या रेल्वे मुळे नोकरदार, विद्यार्थी व सर्वानाच खूप लाभ होत होता.. या रेल्वे मुळे अमलनेरचे अर्थकारण देखील बदलले होते, पण आता ती अवेळी येत असल्याने अनेक अडचणी येत आहेत..
निवडणूक काळात तुम्ही या बाबत वचन दिले होते.. आता पूर्ण करा अशी जनतेची मागणी आहे, सरकार तुमचे असून एक तास वेळ बदलत नाही? आणि अडचण काय आहे? दुहेरी तीहेरी रेल मार्ग झाला आहे.. रेल्वे लोकांच्या सोयीची आहे की नाही? हजारो लोकांची रोज ओढाताण होत आहे, रात्री अपरात्री आल्यावर रिक्षाचा खर्च वाढतो नाईट सांगून जादा पैसे जातात, इतक्या लवकर आल्यावर थांबायचे कुठे? किंवा पहाटे उठून जळगाव भुसावळ गेलो तरी तिथे जाऊन 3 चार तास करायचे काय? बस ने गेले तर जादा खर्च येतो, गरिबांच्या माथी हा भार कशाला? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
आपण लोकसभेत हा प्रश्न मांडा, वेळ बदलून आणा, वर्षोनुवर्षे ज्या वेळेत ही पॅसेंजर 6.50 ला येत होती त्या मुळे कुणाचेही नुकसान झाले नाही, मग अलीकडे ही गैरसोयीची वेळ का निवडली? हे विचारा केंद्रात..
आणि तुम्ही हजारो प्रवाशांचा आशिर्वाद घ्या. असे आवाहन जनता करीत आहे.
आपले हातुन किमान हे एक चांगले काम व्हावे ही जनतेच्या वतीने विनंती.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments