त्यासी आरोग्य धन-संपदा लाभे!
सकाळी लवकर उठले तर विकास होतो बरकत येते वगैरे आपण ऐकत आलो आहोत... हे खरे असेल तर रोज सकाळी वृत्तपत्र टाकायला जाणारे वा दूध वाटायला जाणारे करोडपती व्हायला हवे होते...
असा युक्तिवाद देखील केला जातो...
पण तरीही
सकाळी लवकर उठण्याचे अनेक फायदे आहेत हे नाकारून चालणार नाही.. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:
उत्पादकता वाढते:
लवकर उठल्याने दिवसाच्या सुरुवातीलाच आपल्याला कामासाठी जास्त वेळ मिळतो, ज्यामुळे आपण अधिक उत्पादक होऊ शकतो.
शांतता आणि एकाग्रता:
सकाळी शांत वातावरणामुळे ध्यान आणि एकाग्रता वाढते, ज्यामुळे अभ्यास किंवा कामात चांगली प्रगती होते.
शारीरिक आरोग्य सुधारते:
लवकर उठून व्यायाम केल्याने रक्तप्रवाह वाढतो, हृदय निरोगी राहते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.
मानसिक आरोग्य सुधारते:
लवकर उठल्याने तणाव कमी होतो, शांतता आणि समाधान मिळवतात आणि मानसिक आरोग्य सुधारते.
दिवसाची योजना सुधारते:
लवकर उठल्याने दिवसाच्या कामांची योजना व्यवस्थित करता येते, ज्यामुळे वेळ व्यवस्थापनात मदत होते.
स्वच्छ हवा:
लवकर उठल्याने ताजी हवा आणि ऑक्सिजन मिळतो, ज्यामुळे श्वासोच्छ्वास संबंधित समस्या कमी होतात.
दिवसाला सकारात्मक सुरुवात:
लवकर उठणे आपल्याला दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करण्यास मदत करते, ज्यामुळे दिवसभर उत्साही राहतो.
झोपेची गुणवत्ता:
लवकर उठल्याने झोपण्याची वेळ व्यवस्थित होते, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारते.
लवकर उठून काही काम नसेल तरी वृत्तपत्र वाचन वा अन्य आवडीच्या कामात गुंतवुन घेतले तरी चालते...
ज्यांना रात्री उशिरा पर्यंत खरोखरच कामे असतात.. (दारू पार्ट्या मौज मजा नव्हे!) त्यांनी उशिरा उठायला हरकत नाही. तो नाईलाज म्हणूया!
एरव्ही काम असो वा नसो
एकदा सकाळी लवकर उठायची सवय लागली तर पैसा बरकत येवो ना येवो पण तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता मात्र नक्की दिसेल,...
कायम उशिरा उठणाऱ्या लोकांच्या चेहऱ्यावर 'मांजर मुतून गेले की काय?' या ग्रामीण डॉयलॉग सारखे म्हणजे चेहऱ्यावर 12 वाजले असे दिसते.. हे नक्की!
आमची एक मैत्रीण नेहमी झोपाळू, कायम तीच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असत, नेहमी आरोग्याच्या तक्रारी, सतत ती व तिचा नवरा कुरबुर पिरपीर करीत असे... आले भेटले की रडके, कटकटे आले असा सर्वांचा अनुभव...मी त्याला व तिला हा सल्ला दिला आणि 15 दिवसात जणू चमत्कार व्हावा तसे ते बदलले..
कालच मला सकाळी-सकाळी फोन करून 'मस्त मुगाची उसळ केलीय.. न्याहरी सोबत करूया' म्हणत त्यांनी उत्साहाने बोलावले, मला सुखद धक्का बसला.. रोज 12 वाजे पर्यंत झोपणाऱ्या लोकांनी असा फोन करणे धक्कादायक नसेल का?
काही असो, पण आपला सल्ला कुणाला तरी लाभकारक ठरला या आनंदात मी माझ्या आवडत्या मोगऱ्याला पाणी टाकायला धावलो.. छान वाटले!!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments