शासन आमचे दारी? मग एकदा या जरा आमच्या दारी!

अमळनेर तांबेपुरा, सानेनगर, केशव नगर, रामवाडी, बंगाली फाईल भागातील दुरावस्था पाहा! 
या भागास जोडणारी पुढील गावे ही दुसऱ्या राज्यात किंवा दुसऱ्या देशात समाविष्ट झाली आहेत का? असा प्रश्न 'उत्कर्ष' करू इच्छित स्थानिक लोकांना पडला आहे. 
नुकतेच अमळनेर नगर पालिकेने कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण केले त्याबद्दल सर्व कर्मचारी व लोक प्रतिनिधी यांचे मनःपूर्वक अभिनंदन पण कर वसुली करतांना आपण त्या बदल्यात नागरिकांना काही सुविधांचे देणे लागतो याचा त्यांना विसर पडलेला दिसतोय असा आरोप रहिवाशी करीत आहेत.. 
ठराविक भागामध्ये नको तेव्हढा विकास, आणि काही भाग पूर्ण भकास.. 
कमीतकमी येण्या-जाण्यासाठी एखादी पायवाट तरी शिल्लक राहू द्यायची ते पण नाही. लोकप्रतिनिधींनी त्यांच्या ए सी गाडीतून या भागात किमान स्वतः गाडी चालवून दाखवावी नागरिक त्यांचा जाहीर सत्कार करतील एवढी इथल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. 
आणि त्यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे पावसाला सुरुवात झाली आहे. कुठे रस्ता आहे आणि कुठे डबके हेच मुळात समजत नाही. 
अनेक वर्षापासून या भागातील लोकांची ओरड आहे. नेहमी या ना त्या कारणामुळे जे सी बी मशीन लावून रस्ता खोदला जातो आणि तसाच सोडून ठेकेदार पसार होतो. आता तर जे सी बी इकडे मुक्कामीच असतात. त्यात जवळच विप्रो असल्यामुळे अवजड वाहने इकडून वापरत असतात, आणि रस्ता नसल्यामुळे कॉलनी परिसरातून वाट काढली जाते. त्यात जे आहेत ते रस्तेही धाराशाही होतात.आणि जवळच बोरी नदी आहे तिथून अवैध रेती वाले रात्री बेरात्री कॉलनी परिसरातून सुसाट वाहने नेतात. मोठमोठे डंपर या आधीच मेलेल्या रस्त्यावरून नेली जातात...
या परिसरातील नागरिकांनी वारंवार लेखी निवेदन दिले. लोकप्रतिनिधींच्या कानावर घातले परंतु आजवर कोणीही या भागाकडे लक्ष घालून साधा मुरुम टाकून रस्ता समतल केला नाही. लवकरच शाळा, कॉलेज सुरू होतील विद्यार्थ्यांची ये-जा या भागातून मोठ्या प्रमाणात आहे, निदान उद्याच्या भविष्यासाठी तरी रस्त्याची दुरुस्ती करा असे प्रत्येक नागरिक बोलून दाखवत आहेत. 
उत्कर्ष करू इच्छित असलेल्या एका नागरिकाने दिलेल्या तक्रारी वरून मुख्याधिकारी व प्रशासनाला लोकहितवादीचे आवाहन! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440
🙏🙏

Post a Comment

0 Comments