आ. अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव!

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा!  विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा

अमळनेर येथील आमदार, महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या निवासस्थानी दिवसभर शुभेच्छा देणाऱ्यांची गर्दी झाल्याने परिसरास यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
       
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ना गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यासह इतर मंत्री महोदय, राज्य भरातील नेते, राज्य व जिल्ह्यातील आमदार तसेच इतर सर्वपक्षीय मान्यवरानी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.याशिवाय जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातून अनेक मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी अमळनेर येथे दाखल झाले होते. अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांच्या निवासस्थानाबाहेर टाकलेल्या शामियानात शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ लागली होती. राजकिय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, व्यापारी बांधव, शेतकरी बांधव,युवा व विद्यार्थी, महिला भगिनी तसेच सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी उपस्थिती देऊन शुभेच्छा दिल्या. दिवसभर शुभेच्छांसोबतच विविध सामाजिक कार्यक्रम देखील आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते झाले.
यावेळी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 वाढदिवसानिमित शैक्षणिक साहित्याची तुला

       आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित तहसील कार्यालयासमोरील गुंजाळ झेरॉक्स येथे वही तसेच शैक्षणिक साहित्याची तुला करण्यात आली.या वहितुलेतील जवळपास १५०० वह्या आयोजकांकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.प्रसन्ना जैन, गजु गुंजाळ, सतीश पारख, सुनील जैन यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. आमदार अनिल पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

रक्तदान शिबिरात 138 बॅग रक्तसंकलन
  
      आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे येथील जीवनज्योती रक्तपेढी ,अमळनेर येथील जीवनज्योती रक्तपेढी आणि जळगाव येथील रेड प्लस सोसायटी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास शहर व ग्रामीण भागातील युवा कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला.एकूण 138 युनिट बॅग रक्त संकलित झाले.यावेळी अपंगांना व्हीलचेअर व कर्ण यंत्र देण्यात आले.

टॅक्सी युनियन तर्फे सहा नव्या टॅक्सीचे उद्घाटन

     कालानुरूप बदल म्हणून अमळनेर येथील काली पिली टॅक्सी युनियन ने आमदार अनिल पाटील यांच्या प्रेरणेने नवनिर्माण करण्याचा निर्णय घेतला असून आमदारांच्याच सौजन्याने भव्य पिकअप शेड तयार झाले आहे.आता आमदारांच्या वाढदिवसाच्या दिवशीच जळगाव पीपल्स बँकेच्या आर्थिक सौजन्याने सहा नव्या मारुती इको कंपनीच्या टॅक्सी अमळनेर येथे दाखल झाल्याने आमदार अनिल पाटील यांच्या हस्तेच या टॅक्सी चे उद्घाटन करण्यात आले.यावेळी सर्व चालक व वाहकांनी केक कापून आमदारांचा वाढदिवस करत लवकरच अजून इतरांच्या नव्या टॅक्सी दाखल होतील असा विश्वास आमदारांना दिला.प्रवाश्यांच्या सोयीसाठी होत असलेल्या बदलाचे आमदारांनी कौतुक केले. 
       दरम्यान वाढदिवसाच्या दिवसाचे अवचित्य साधून अनेक इतर पक्षातील मान्यवरांनी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.याशिवाय शहर व ग्रामीण भागात विविध सामाजिक उपक्रम पार पडले. शहरात नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिंच्यावतीने वाढदिवसाच्या भव्य दिव्य असे बॅनर व कमान लावल्यामुळे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले होते.

Post a Comment

0 Comments