तरीही दाखल होणार अनेक अर्ज!
मातब्बर उमेदवार येण्याची शक्यता बोलली जात असल्याने
किमान मनधरणी करायला कुणी यावे, अर्थलाभ किंवा राजकीय वा अन्य पद पदरी पाडून घ्यावे असा अनेकांचा प्रयत्न असेल..
एका-दोघाला 'स्वीकृत सदस्य' करून घेण्याचा 'लाडूही' मिळू शकतो!
कारण, प्रतिष्ठेचा प्रश्न असल्याने काहीही करून बिनविरोध करायचा प्रयत्न होईल आणि तसे नाहीच झाले तरी स्वप्ने,आश्वासने व पाकिटे तयार असतीलच..
एकूणच
प्रभाग 15 च्या उमेदवार व मतदारांची लॉटरी खुलली असल्याचे गोड स्वप्न अनेकांना पडले आहे.
आता या स्वप्नाळू लोकांची स्वप्न पूर्ती होते की भंग हे येत्या 4 दिवसात ठरेल.
परंतु एका निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारपतीने लोकहितवादीला सांगितले की, "आम्ही 5 वर्ष तयारी करीत आहोत, सतत संपर्क व कामे करीत आहोत, मोठा खर्च देखील केला आहे आणि आता माघार घेऊन काय आयुष्यभर 'झोऱ्याच' उचलायचा का? म्हणून आम्ही लढणारच!!"
या 'त्यांच्या' प्रतिक्रियेवर 'ते' ठाम राहून निवडणूक लढतील का? तसे झाले तर त्यांचे धाडसाला मतदार सकारात्मक प्रतिसाद देऊन चमत्कार घडवतील का? हे पाहणे रंजक ठरेल.
सविस्तर वृत्त 17 च्या सायंकाळी.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments