घराघरात आशेची नवी ज्योत सौ. भारती रमाकांत माळी यांच्या उमेदवारीला सर्व समाजघटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

प्रभाग 13 मधून इच्छुक उमेदवार सौ. भारती रमाकांत माळी यांना मिळतोय जेष्ठ आबालवृद्ध व सर्वांचा आशीर्वाद!
*“प्रामाणिक कार्याची ओळख, पारदर्शक नेतृत्वाची दिशा असलेल्या सौ. भारती रमाकांत माळी यांच्या उमेदवारीने वॉर्डात निर्माण झाले नवचैतन्य!”*
अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५ – वॉर्ड क्र. १३ (महिला राखीव) मधून सौ. भारती रमाकांत माळी यांच्या उमेदवारीची घोषणा होताच वॉर्डात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
सामान्य घरातून आलेल्या, प्रामाणिक आणि सेवाभावी व्यक्तिमत्त्व असलेल्या सौ. माळी यांच्या उमेदवारीने नागरिकांमध्ये नवीन आशा, विश्वास आणि विकासाची भावना निर्माण केली आह..
🌺 तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत – सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद व मिळणारा आशीर्वाद लक्षणीय आहे!
 सौ. भारती माळी यांनी वॉर्डातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट भेटीगाठी घेणे, संवाद साधणे, त्यांच्या अडचणी ऐकून घेणे आणि आशीर्वाद घेणे ही मोहीम सुरू केली आहे.
नागरिकांशी अशा प्रकारे प्रत्यक्ष संवाद साधण्याच्या त्यांच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
गोरगरीब, महिला, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उमेदवारीचे उत्स्फूर्त स्वागत करत त्यांना मनःपूर्वक आशीर्वाद आणि शुभेच्छा देत आहेत.
💧 “विकास, संवाद आणि सेवा – हाच आमचा मार्ग”
सौ. माळी यांनी वॉर्डातील रस्ता, पाणी, वीज, स्वच्छता आणि सुशोभीकरण या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्या म्हणतात, “नागरिकांचा विश्वास हेच माझं बळ आहे. त्यांच्या आशीर्वादाने आणि मार्गदर्शनाने मी वॉर्ड १३ च्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”
सौ. माळी या नागरिकांच्या समस्या मनापासून ऐकून घेत असून, त्यावर प्रामाणिक आणि तळमळीने काम करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
नागरिकांनी त्यांना एक कार्यक्षम, संपर्कात राहणारी आणि सेवाभावी उमेदवार म्हणून स्वीकारले असून, त्यांच्या प्रचाराला प्रत्येक स्तरातून भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
⚖️ “सेवेची परंपरा आणि समाजाशी असलेलं नातं – हेच आमचं बळ” असल्याचे ते नम्रपणे सांगतात. सौ. भारती माळी या सुप्रसिद्ध वकील आणि समाजसेवक ॲड. रमाकांत माळी यांच्या पत्नी असून, समाजसेवेचा वारसा आणि लोकसंपर्काची परंपरा त्यांच्या कार्यात स्पष्ट दिसते.
त्यांच्या सभ्य, सौम्य आणि कार्यक्षम व्यक्तिमत्त्वामुळे वॉर्डात सकारात्मकता आणि विकासाची नवी ऊर्जा दिसून येत आहे.
💐 “आपले मत – आपल्या वॉर्डाचा विकास!”
वॉर्ड १३ मध्ये आता एकच घोषणा घुमते आहे—
✋सौ. भारती रमाकांत माळी यांना मत म्हणजे आपल्या वॉर्डाच्या प्रगतीचा भक्कम  पाया!!
🗳️ अमळनेर नगरपरिषद निवडणूक २०२५
वॉर्ड क्र. १३ अ (महिला राखीव)
🌸 सौ. भारती रमाकांत माळी यांना विजयी करा! 🌸
🕊️ “सेवेची भावना, संवादाचा दुवा आणि विकासाची दिशा – वॉर्ड १३ साठी नवा विश्वास!”
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
79728 81440

Post a Comment

0 Comments