अमळनेरात आमदार पत्नी जयश्री पाटील यांचे नेतृत्वाखालील शहर विकास आघाडीस जखमी शेर शिरीषदादा चौधरी, ललिता पाटील यांचे नेतृत्वाखालील शिवसेना (शिंदे) जोरदार टक्कर देणार असे चित्र असले तरी केडर असलेल्या भाजपाची ताकद देखील मोठी आहे. यात उशिराका असेना पण काँग्रेस, उबाठा, व शरद पवार राष्ट्रवादी सक्रिय झाल्याने त्यांच्या ताकदीकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.
या शिवाय अनेक प्रभागात स्वतःची ताकद व वलय असलेले उमेदवार स्वतंत्र लढण्याची तयारी करीत आहेत.
अगदी शेवटच्या क्षणी खासदार ताई व आमदारदादा यांच्यात एकमत होईल अशी शक्यता धूसर वाटत आहे.
याचाच अर्थ अनेक ठिकाणी तिरंगी चौरंगी तर काही ठिकाणी पंचरंगी लढत होईल हे असे दिसते आहे.
मूळ मुद्दा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण राहील हा आहे.
जी नावे चर्चेत आहेत ती सर्व तुल्यबळ व शहरभर त्यांचे नेटवर्क आहे अशीच असल्याने ह्या लढतीत देखील मोठी चुरस बघायला मिळणार आहे.
एका दादाकडे नकार मिळाला तर दुसरा दादा दोघीकडे नकार मिळाला तर ताई आणि तिथेही जागा भरली गेली तर महाविकास आहेच! या भाऊगर्दीत एखाद्याने अपक्ष म्हणून पाय घातला व योग्य नियोजन केले तर त्याचीही लॉटरी खुलू शकते अशी स्थिती आज तरी आहे.
असेच चित्र प्रभागात सुध्दा दिसून येत अपक्ष उमेदवाराने काळजीपूर्वक नियोजन करून उडी घेतली तर तो या तिघा चौघांना चित करू शकतो असे घडल्यास नवल वाटू नये.
एकूण चित्र येत्या 2 दिवसात स्पष्ट होणार असे म्हटले जात असले तरी खरे चित्र माघारीच्या दिवशीच समोर येईल व आमचे वृत्तांकन खरे ठरेल हे नक्की.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments