वेळ कमी असूनही उमेदवारीचा खेळ मांडल्याने अस्वस्थता!
इच्छुक उमेदवारांतील डॉ परीक्षित बाविस्कर हे कार्ड चालणारे नाही.. रणजित शिंदे व जितू ठाकूर ही चर्चेत असलेली नावे अद्याप तिघा पक्ष/आघाडी कडून निश्चित होत नाहीत, शहर विकास आघाडी व भाजपा याचे कडून ठोस असे काही जाहीर केले गेले नाही, परंतु शिंदे सेनेचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आज जाहीर केला जाईल अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
आरक्षण जाहीर होताच जोरदार चर्चेत आलेले रणजित शिंदे व जितू ठाकूर यांची दमछाक होई पर्यंत त्यांना शहर विकास आघाडीने खेळविले असल्याचे दिसत आहे.
यात मध्येच डॉ परीक्षित बाविस्कर हे नाव देखील चर्चेत आले परंतु हे कार्ड चालणार नाही असा जनमानस आहे, त्या ऐवजी दिलीप राजाराम सोनवणे किंवा विजय बाविस्कर यांच्या पत्नी उमेदवार असतील तर सर्व स्तरातून स्वागत होऊ शकते असाही मतप्रवाह आहे.
काहींना कानाखालचा म्हणजे सह्याजीराव असलेला उमेदवार हवा असल्याने वेळकाढू धोरण अवलंबून टाइम किलिंग सुरु असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे चर्चेत असलेल्या नावा पेक्षा अनपेक्षित असे नाव शेवटच्या क्षणी जाहीर झाल्यास नवल वाटायला नको,
एकूणच अमळनेर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण? हे घोंगडे अद्याप भिजत पडले आहे. शिंदे सेनेचे उमेदवार आज जाहीर झाल्यास त्यांना तयारीला जादा वेळ मिळून फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपाचा उमेदवार देखील केडर बघून येतो की एरंडोल/पारोळा सारखी खेळी होऊन जागा सोडून देणार हे देखील येत्या 2 दिवसात कळेल.
तूर्तास सर्वांनी खेळ मांडला असून कुणीही दमदार उमेदवार अपक्ष लढेल अशी हिम्मत दाखवून तयारीला लागलेला नाही याचे जास्त आश्चर्य वाटत आहे. तिकीट मिळो न मिळो मी विकासासाठी कटिबद्ध राहून उमेदवारी करीत आहे असे सांगून जो धाडस करेल त्याला अमळनेरकर डोक्यावर घेतील अशी खात्री आहे परंतु तशी हिम्मत अद्याप कुणी दाखवत नाही याचे वैषम्य वाटते. आणि
राजकीय व सामाजिक क्षेत्रात याच विषयाची चर्चा झडते आहे.
आगामी रिपोर्ट....
अनपेक्षित उमेदवार दिल्यास मतदारांचा काय असेल कौल व कारणे? या बाबत लोकहितवादी लिहिणार आहेच.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments