वाढपींनी तुपाची धार स्वतःचे ताटात घेतल्याचाही आरोप!
अमळनेर शहरात पाकिटांची कोटीच्या कोटी उड्डाणे... अपवाद वगळता प्रत्येक उमेदवाराने किमान हजारी भेट पोच केल्याची चर्चा असून चेहरे, जात, धर्म पाहून व खात्री वाटत असेल तेथेच प्रेमळ भेटी-गाठी झाल्याने अनेकांचा अपेक्षाभंग तर अनेकांना लक्ष्मी भरभरून प्रसन्न झाल्याचे दिसून आले. रात्री उशिरापर्यंत वाट पाहत चौका-चौकात जथेच्या जथे जमले होते तर महिला मंडळी सुद्धा 'उनात का? म्हणत एकदुसऱ्या महिलेस प्रश्न करत जागते रहो अशी सूचना देताना दिसून आल्या.
या मोठ्या आर्थिक घडमोडीत ज्यांना ही भेट पोचवायला नेमले होते त्यातील अनेकांनी स्वतःच हात मारल्याचे आरोप रात्री उशिरापर्यंत जागून हाती काही आले नाही अशा लोकांनी केले.
लक्ष्मीने पाठ दाखवली अशा नाराज भक्तांनी मतदानच करायचे नाही, केले तर अमक्याला देणार नाही टमक्याला पाडू, पाकीट आल्याशिवाय मतदानाला निघायचेच नाही असा निर्धार केल्याचेही समोर आले आहे.
या सर्वांचा मोठा परिणाम निवडणूकीवर नक्की होणार मात्र ही नाराज मंडळी कुणाचा पाटा पाडेल या बाबतच्या रंगतदार चर्चांनी हसू आवरेनासे झाले होते.
रात्री उशिरा फेरफटका मारे पर्यंत फिरून कुणीतरी पाकीट आणेल या आशेत अनेक जन दिसून आले.
मतदानाचे काळात जे मतदानाला निघालेच नाहीत त्यांना घरी जाऊन मन वळवून जो आणेल त्या उमेदवाराला लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जर असे झाले नाही तर जेमतेम 50 ते 55% इतकेच मतदान होईल असा अंदाज आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
79728 81440
0 Comments