खूप दिवस होणार होणार म्हणत लटकलेली जिल्ह्यातील नव्हे तर राज्यभर चर्चेत असलेल्या खानदेश शिक्षण मंडळाची निवडणूक जाहीर झाली आहे. 4 जानेवारी रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून अध्यक्ष जितेंद्र झाबक हे निवडणूक लागावी म्हणून संघर्ष करताना दिसत होते. ते शब्दाला जागले अशी प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली आहे.
विविध कारणे संचालक मंडळ व विरोधक तसेच अध्यक्ष व संचालक मंडळ यांच्यात संघर्ष चर्चेत आला होता. थेट प्रसिद्धी माध्यमात हा विषय रंगला असल्याने मतदारांची नाराजी देखील व्यक्त झाली होती.
अखेर आज 3 जानेवारी रोजी अध्यक्ष जितेंद्र झाबक व चिटणीस प्रा. पराग पाटील यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने या विषयावर पडदा पडला आहे.
13 डिसेंबर पासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होऊन 4 जानेवारी रोजी मतदान होणार आहे.
नेहमीच असणारे 'कधी अंदर कधी बाहर' अशा संचालक मंडळातील उमेदवारां सोबतच अनेक नवे मातब्बर देखील या निवडणुकीत उमेदवार म्हणून समोर येतील अशी अटकळ बांधली जात आहे.
खा. शि निवडणूकीत दोन पॅनलच्या गठनाची तयारी सुरू झाली असून कोणाच्या नेतृत्वाखाली कोणते पॅनल असेल? कोणते नवे चेहरे यात असतील? दोघा पॅनल व्यतिरिक्त स्वबळावर उभे राहणाचा निर्णय कोण घेणार?
गत वेळी दोन्ही पॅनल ने नाकारल्याने खट्टू झालेले मंगलसिंग सूर्यवंशी यांना कोण जवळ करणार? बिपीन पाटील यांना पॅनल मध्ये घेण्याची कुणाला भीती वाटते? या बाबत सविस्तर व सत्य माहितीसह मालिका दै. डेबूजी मधून सुरू करणार आहोत.
【बातम्या मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप गृपला जॉईन व्हा】
लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
79728 81440
0 Comments