खा शि मंडळ निवडणुकीत गत वेळी काठावर पास झालेलांब एका उमेदवार त्या नंतर अदृश्य झाला होता.. बहुदा झोप लागली असावी.. त्याला आता जाग आली असून मतदारांचा आशीर्वाद घ्यायला जोरदार धावपळीत हे महाशय गढून गेले असल्याचा किस्सा खाशि परिवारात चविने चर्चिला जात आहे.
निवडणूक ते निवडणूक असा पवित्रा घेणारे हे साहेब साडेतीन चार वर्षे कुठे बेपत्ता होते? मतदारांच्या सुख दुःखात, मरण-धरणाला कधी सहभागी होणे यांना कधीच माहीत नाही. वा खाशि च्या विकासासाठी यांनी काय केले याची ठळक माहिती सुद्धा कुणी सांगू शकत नाही असा आरोप देखील मतदार करीत आहेत.
केवळ 'स्व कल्याण' करून घेण्यासाठी त्यांची धावपळ असून आयत्यावेळी येऊन मत मागणाऱ्या या उमेदवाराला 'कल्याणदायक' 'आशिर्वाद' मिळण्यात या वेळी मोठी 'अडचण' येईल असे जाणकारांचे मत आहे.
उलट ज्यांचे सोबत 'आशिर्वाद' मागू इच्छितात त्यांनाच 'ग्रहण' लागण्याची शक्यता जास्त आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~
खा.शि.निवडणूक खास खबर भाग-2
'ती'च्या नादात चार वर्षे रखडलेली गाडी आता वेळ भरून काढेल का?
उद्या सविस्तर..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*वरील फोटो प्रतिकात्मक आहेत याची नोंद असू द्यावी.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै डेबूजी
79728 81440
0 Comments