जितेंद्र ठाकूर या कोवळ्या तरुणाचा व विनोद कदम यांचा घरच्या मैदानातच राजकीय बळी?
कोणतेही सभा समारंभ असो ,की साधे 4 कार्यकर्त्यांत बोलणे असो अनिल पाटील हे नंदुरबार व चौधरी बंधू यांच्यावर तोंडसुख घेण्याची संधी सोडत नाहीत, त्यांना बहुदा झोपेतही चौधरी बंधू दिसतात असेच वाटते....तो नंदुरबारचा, हा जळगावचा... अमुक तिकडचा, त्याला तर मीच संपवेल.. याला तर गासोड्यात बांधून पाठवेल.. त्याले ते तंगड्या धरी उपटसु... ही काय परिपक्व राजकारणी नेत्यांची भाषा झाली? पण अनिलदादा असेच बोलत राहिले, न प. निवडणुकीत विकासाचे कोणतेही व्हिजन/विचार त्यांनी मांडले नाहीत हे जनतेने पाहिले..
दुसरे म्हणजे दोनदा आमदार, मंत्रीपद मिळाल्या पासून त्यांना इतका गर्व झाला आहे की ते कुणालाही कचराच समजतात.. बिलकुल कुणाला किंमत देत नाहीत, सारे मूर्ख व मी एकटा शहाणा ही त्यांची बॉडीलँग्वेज त्यांच्या बद्दल नकारात्मक वातावरण तयार करत गेली.
तिसरे म्हणजे बँक, डेअरी, सर्व महत्वाची पदे, सूत्रे आपल्याच हातात राहावीत म्हणून त्यांचा आटापिटा त्यांच्या जवळच्या कार्यकर्ते व नेत्यांना देखील टोचत होता.. जिल्हा परिषद निवडणुकीत मुलाला पुढे करण्याची खेळी देखील त्यांना अमळनेर नप निवडणुकीत नडली.. हा पुढे नडेल म्हणून जी प गटातून काहींनी अमळनेरच्या निवडणुकीत पडद्यामागून सूत्रे हलवत सेनेला मोठी रसद पुरवली हे देखील शहर विकास आघाडीचे पराभावाचे कारण ठरले. आता मुलासाठी जी. प. प्रवेश इतका सोपा आहे या भ्रमात राहून पुन्हा चूक करू नये..
ज्या व्यापारी वर्गाची मदत घेतली त्यांना वाऱ्यावर सोडले याचे उत्तम उदाहरण म्हणजे खा. शि. मंडळ निवडणुकीत एकमेव 'त्यांचा' त्यांच्याच परिवारातील उमेदवार! ज्या व्यापारी वर्गाची मदत घेतली त्यांना कुणालाही पाठिंबा दिला नाही, हा स्वार्थी व 'जातीय' दृष्टीकोन लोक बोलून दाखवत आहेत.
एकूणच काय तर अति अहंकार, स्वार्थ व जवळील लोकांना किरकोळ समजणे घातक ठरुन जितेंद्र ठाकूर या तरुणाचा बळी गेला. त्यांच्याच पत्नी सोबत एकाच प्रभागात एकाच चिन्हावर उमेदवारी करणारे खंदे समर्थक विनोद कदम यांचा देखील बळीच गेला आहे, जयश्री पाटील यांना मिळालेली मते विनोद कदम यांना मात्र मिळाली नाहीत... याची कारणे समजायला जनता दूध खुळी नाही..
थोडक्यात म्हणजे शिरिषदादा चौधरी यांना जनाधार होताच पण त्याला सुरुंग लावण्या ऐवजी दिशा भरकटलेल्या अनिल पाटील यांनीच माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांचे साठी रेड कार्पेट अंथरले हे प्रकट सत्य कुणीही नाकारणार नाही या चर्चेला सर्वत्र दुजोरा मिळत आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
कार्यकारी संपादक
दै. डेबूजी
79728 81440
0 Comments