अपक्ष विजयी होऊन अमळनेर मतदार संघात कोट्यवधींची विकासकामे करून अमळनेरचा विकास करणाऱ्या शिरीष दादा व साहेबरावदादा यांची नक्की काय भूमिका? हे अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसत आहे. आज प्रचार थांबत असल्यावर देखील दोन्ही दादांचे मौन वा मूक संमती कुणास तारणारी? मारणारी? हा लटकता सवाल आहे.
या दोघे 'दादांनी' अपक्ष आमदार म्हणून प्रभावी कार्य केले.. तसेच दोघांनी नगरपरिषद सत्ता प्राप्त करून तेथे देखील आपले कर्तृत्व सिद्ध केले.
दोघांनी केलेले विकास काम 'उजवे व कायम' आठवणीत राहणारे आहेच.
कधी नव्हे तो या दोन्ही अपक्ष आमदारानी दुर्लक्षित अमळनेर शहराचा काया पालट केला. हे कुणीही नाकारणार नाही!
तरी देखील विधानसभा निवडणुकीत अनिल पाटील या तिसऱ्या दादांना विजयी करण्यात मोठा रोल केला, त्यांचे साठी मोठा त्याग केला.
या त्यागाचे त्यांना काय फळ मिळाले? त्यांना वाऱ्यावर ठेवण्यात आले.
तसेच कमळ हाती घेऊन देखील शिरिषदादा यांना स्व-पक्षीय लोकांनी काय रिटर्न दिले,,? हातात कमळ घेऊन घडी-घडी खेळ मांडला गेला होता.
'हेचि फळ काय मम् तपाला?'
असे म्हणायची वेळ आज या दोन्ही माजी आमदारांवर आली आहे.
कृषिभूषण साहेबरावदादा व शिरिषदादा चौधरी यांचे वाट्याला दुःखच आले, कुणाला जात नडली तर कुणाला जास्तीचे विकास काम आडवे आले,.
आज ज्यांना मदत केली ते अनिल दादा कृषिभूषण यांचे पासून हातचे अंतर राखून अडवणूक करीत असल्याचे दिसत आहे, तर शरीराने स्मिता वाघ यांच्या प्रचारात सक्रिय दिसत असले तरी शिरिषदादा मनापासून त्यांचे सोबत आहेत असे कुठेही दिसत नाही.
या दोन्ही दादांवर 'ताई व दादाने' अन्याय केला असल्यानेच दोघांनी उघड भूमिका घेतली असे दिसत नाही.
कृषिभूषण साहेबराव पाटील उघड्या तोंडाचे असले तरी सत्य मांडून मोकळे होतात, तसे शिरिषदादा हे देखील प्रामाणिक व लोकसंग्रह करणारे म्हणून ओळखले जातात.
स्मिता वाघांना लोकसभा जिंकायची असेल तर या दोघांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, हे ताईंना व मविआ ला समजत नाही का?
एकूणच शिरिषदादा व कृषिभूषण साहेबरावदादा यांचे सूचक मौन कुणाच्या फायद्याचे आहे हे येणारा काळ ठरवेल!
पण प्रचार थांबण्या पूर्वी दोन्ही दादांना सक्रिय करून त्यांची नाराजी दूर केली नाही तर याचे दूरगामी परिणाम लोकसभा व अमळनेर मतदार संघावर होतील हे नक्की!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments