एके दिवशी त्या जंगलात मोठी आग लागली. सर्व प्राणीमात्रांमध्ये खळबळ माजली. प्रत्येकजण आपापल्या जिवासाठी धावू लागला. ज्या झाडावर लहान चिमणी व खारुताई राहत होती ते झाडही आगीत अडकले. त्यांनाही आपले घरटे सोडावे लागले.
मात्र जंगलातील आग पाहून त्या घाबरल्या नाहीत.. दोघे लगेच नदीवर गेल्या आणि चिमणीने चोचीत व खारुताईने तोंडात पाणी आणून वणवा विझवायला लागल्या,
आगीवर पाणी शिंपडून ते पुन्हा नदीकडे निघाले... अशाप्रकारे नदीतून पाणी भरून त्या पुन्हा पुन्हा जंगलाच्या आगीत टाकू लागल्या.
त्यांना हे करताना बाकीच्या प्राण्यांनी बघितल्यावर ते हसू लागले आणि म्हणाले, "अगं चिमणीराणी व खारुताई, तूम्ही काय करताहेत?
पाण्याने भरलेल्या इवल्याशा तोंडाने ही जंगलातील आग विझेल का? हे तर सुर्यावर थुंकण्या सारखे.. तुमची ताकद ती काय? मूर्खपणा सोडा आणि जीवनासाठी धाव घेत आमच्या सोबत या. जंगलाची आग अशा प्रकारे विझवली जाणार नाही.
त्यांचे बोलणे ऐकून चिमणी व खार म्हणाली की
"तुम्हाला येथून पळून जायचे असेल तर पळा. आम्ही येथून पळ काढणार नाही. हे जंगल आमचे घर आहे आणि आम्ही आमच्या घराचे रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करुच!"
जंगल वाचलेच नाही व आमचा जीव गेला तर किमान आमचे वारसदार म्हणतील की आमचे पूर्वज गांडू/ भित्रे/ नेभळट अंधश्रद्ध/ धर्म अंध नहोते! विचार करणारे होते
त्यांनी किमान आग विझवायचा प्रयत्न करून स्वतःच्या प्राणांची आहुती आमच्या साठी दिली!
मग, आम्हास कोणीही साथ देवो अथवा नाही.!!
चिमणी व खारुताई यांचे हे बोलणे ऐकून सर्व प्राण्यांची शरमेने मान वाकवली.
त्यांना आपली चूक कळली. सर्वांनी त्या चिमुकल्या चिमणी व खारुताई यांची माफी मागितली आणि मग त्याच्यासोबत जंगलातील आग विझवण्याचा सर्वांनी प्रयत्न सुरू केला. अखेर त्यांची मेहनत रंगली आणि जंगलातील आग विझली.
थोडक्यात--- कितीही मोठे संकट आले तरी प्रयत्न न करता कधीही हार मानू नका. आपले घर व देश वाचविण्यासाठी मी चिमणी व खारीचे 'ते' बळ घेऊन काम केले.. तुम्ही देखील करा.
मी यथाशक्ती माझे काम केले, तुम्ही देखील करा! आजचे मतदान फक्त भविष्यात वाढून ठेवलेला 'वणवा' विझविण्यासाठीच करा!!
-धनंजयबापू सोनार
अमळनेर
(जळगाव)
7972871440



0 Comments