पाणी शोधता
काटे असावे देहालागी!
क्रूर माणसे
रोज कुर्हाडी
तरी जगतो बांधालागी!
मारत रहा
पुन्हा जगतो
भाले घेऊन अंगालागी!
ध्यास एकच
कास खऱ्याची
भिडु एकदा नभालागी!
तोडत राहो
शेंडा बुंधाळे
पालवीच पदरालागी!
जन्म मुळात
लढण्या साठी
नित्य भेट मरणालागी!
-धनंजय सोनार
अमळनेर
7972871440

0 Comments