संजय गांधी, श्रावणबाळ सेवा व राज्य निवृत्ती वेतन योजना मार्गदर्शन व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

संदीपराजे घोरपडे यांचे जनतेस नम्र आवाहन 
पात्र असलेल्या लोकांनी अनुदानासाठी कागदपत्र सादर करण्याचे आवाहन करतानाच ज्यांनी या पूर्वी अर्ज केले आहेत त्यांनी देखील संपर्क केल्यास शासन दरबारी पाठपुरावा आमचे कडून करण्यात येईल. 

ज्यांना अर्ज करणे कागदपत्रे आदी बाबत माहिती व मार्गदर्शन हवे असल्यास पुढील ठिकाणी सकाळी 9 ते सुर्यास्ता पर्यत संपर्क करावा.
असे आवाहन संदीपराजे घोरपडे यांनी केले आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे अनुदान डी.बी.टी व्दारे करणेकरिता दि. 7 फेब्रुवारी, 2024 रोजी मा. सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचे अध्यक्षतेखाली झालेली व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे मार्गदर्शन करण्यात आले तसेच दिनांक 29 फेब्रुवारी, 2024 तसेच दिनांक 15 मार्च, 2024 व 31 मे, 2024 रोजी सदर विषयी श्रावणबाळ/ संजय गांधी योजनेचे अनुदान डी.बी.टी.व्दारे करणेकरीता आवश्यक कार्यवाही करणेबाबत जिल्हास्तरावर बैठक घेण्यात आलेली आहे.
एप्रिल 2024 पासून लाभार्थ्यांना अनुदान हे डी. बी. टी व्दारे वितरीत करणेबाबत शासनाचे धोरण आहे. त्या अनुषंगाने सर्व लाभार्थ्यांनी संबंधीत तलाठी यांच्याकडे आधारकार्ड, बँक पासबुक, लाभार्थ्याचा मोबाईल नंबर, योजनेचा प्रकार , जात प्रवर्ग, दिव्यांगाचा प्रकार व दिव्यांग टक्केवारी, उत्पन्न प्रमाणपत्र, राशन कार्ड, लाभार्थ्याच्या आधारला व बँकेस लिंक असलेला मोबाईल नंबर ही सर्व कागदपत्रांची छायांकित प्रत संबंधित गावचे तलाठी यांच्याकडे 31 मे, 2024 पर्यंत दाखल करावी. जे लाभार्थी सदरील कागदपत्रे सादर करणार नाहीत याची सर्वस्वी जबाबदारी लाभार्थी यांची राहील याची सर्व लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी , तरी जळगाव जिल्हयातील विशेष सहाय्य्‍ योजना लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, डी. बी. टी साठी आवश्यक कागदपत्रे आपल्या संबंधित तहसिल कार्यालयांकडे जमा करण्यात येवून सर्व लाभार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन शासनाने केले आहे. 
त्यास प्रतिसाद द्यावा व लाभ घ्यावा
संपर्क कार्यालय उद्घाटन दि. ११ जून २४ पूज्य सानेगुरुजी स्मृती प्रित्यर्थ 
वेळ-सकाळी ९ वाजता
ठिकाण - संदीपराजे घोरपडे, संपर्क कार्यालय, 
गौरीसूत प्रतिष्टान, छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह, अमळनेर (जळगांव)
*विनीत*
संदीपराजे घोरपडे 
गौरीसूत प्रतिष्ठान, अमळनेर
-----------

-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments