अमळनेर सह जिल्ह्यात सर्वत्र विक्री!
अमळनेर येथील असलम बागवान हे किरकोळ विक्रेते लिची फळाची विक्री करीत आहेत.
त्यांचे सह 3 ते 4 लोक हे फळ हातगाडीवर 250 ते 300 रुपये किलोने विक्री करीत असून ज्यांना या फळांचे महत्व माहीत आहे ते लोक धाव घेत असल्याने या विक्रेत्या कडे रीघ लागली आहे.
जेमतेम महिनाभर येणारे हे पश्चिम बंगाल वा घाट माथ्यावर पिकणारे फळ महाग असले तरी आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे.
लीचीचे आरोग्यासाठी फायदे... लीचीमध्ये पोटॅशियम, तांबे, व्हिटॅमिन सी, एपिकेटचिन आणि रुटिन सारखी अनेक निरोगी खनिजे, जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे हृदयरोग, कर्करोग आणि मधुमेहापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतात.
लिची ज्यूस व अन्य बाय प्रोडक्ट मिळतात पण फ्रेश लिची उपलब्ध झाली तर तिचा मूळ आस्वाद घेताना आरोग्य सांभाळणे सोपे होईल.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments