खाजगी शाळे सह सर्वच शाळा महाविद्यालयात वाढदिवस-पुण्यतिथीचा जलसा?

शिक्षण कमी व वाढदिवस पुण्यतिथीचे कार्यक्रमच जास्त!!
राष्ट्रीय महापुरुषांचे स्मरण करणे योग्यच आहे, त्या निमित्ताने विद्यार्थी वर्गास इतिहास समजतो, ज्ञानात भर पडते,
पण शासन निर्देशित नसलेल्या कोणत्याही व्यक्तीचे वाढदिवस, पुण्यस्मरण साजरे करण्याची जणू परंपरा सुरू झाली आहे,
शाळेचे मूळ नाव बदलणे, स्वतःचे वा आई वडील भाऊ यांचे स्मरणार्थ वा जन्म दिवस साजरे करताना विद्यार्थ्यांना तासोनतास बसवून ठेवले जाते, निरर्थक भाषणे ठोकली जातात, शिक्षण बाजूला राहते व यांचे प्रमुख पाहुणे व नातेवाईक लोकांचे स्वागत तथा आरत्या सुरू राहतात.
शिक्षक वर्गास धाक दाखवून कामास लावले जाते..वरून वेळ प्रसंगी त्यांचे कडून वर्गणी देखील वसूल केली जाते.
आपल्या बापाचे सर्व गुलाम आहेत या अविर्भावात संस्थाचालक वागताना दिसत आहेत. या कारणे नाराज पालक व अनेक शिक्षकानी लोकहितवादी कडे तक्रारी देऊन आवाज उठवा अशी विनंती केली आहे.
जी प शाळेत देखील जी.प./प.स. सदस्य, सरपंच आदी आजी माजी पुढारी असे उपक्रम घेऊन स्वतःची आरती म्हणवून घेत वेठीस धरतात व वृत्तपत्र तथा सोशल मीडियावर मिरवून घेतात हे गंभीर दृश्य चिंताजनक आहे.
अमळनेर शहर, तालुका, जिल्हा नव्हे तर राज्यभर असे प्रकार सुरू असून शिक्षण विभागाने अशा बेकायदा उपक्रमावर बंदी घालावी.
शाळेत शासनाने निर्देश दिलेले महापुरुषांचे फोटो वगळता कुणाचेही फोटो लावू नयेत, त्यांचे कार्यक्रम साजरे करू नयेत व शिक्षण महत्वाचे या बद्दल स्पष्ट निर्देश दिले पाहिजेत.
अमळनेर शहर व तालुक्यातील अनेक शाळा-महाविद्यालयात चेअरमन, संस्थापक, त्यांचे नातू, पंतू, जंतू यांचेच फोटो जास्त असून त्यांचे कौटुंबिक कार्यक्रम जोरदार साजरे होतात.
एक समोसा व अर्धा पेढा देऊन विद्यार्थ्यांना 3 ते 4 तास वेठीस धरले जाते.
शिक्षण विभाग कारवाई करणार का? पालकांनी देखील याचा विरोध केला पाहिजे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments