नुकतीच झालेली लोकसभा निवडणुक आणि पुढे येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समविचारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या प्रागतिक समविचारी संघटनांचा उत्तर महाराष्ट्र मेळावा 23 जून 2024 रोजी साने गुरुजी विद्यालय अमळनेर येथे पार पडला त्या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी विचार मांडताना सांगितले की भविष्यातील विधानसभा निवडणुकीत नवा चेहरा म्हणून प्रामाणिक व सदैव उपक्रमशील असलेल्या संदीपराजे घोरपडे यांचे नावाचा विचार करावा.
राजकारण हे बदलत असते लोकशाहीत आपोआप काहीच घडून येत नाही.आपल्या सर्वांना अधिक काम केले पाहिजे. त्या पुढे विचार मांडताना म्हणाल्या की आपण सर्वांनी जीव तोडून काम केले पाहिजे आणि अमळनेर मध्ये एक नवीन चेहऱ्याला संधी दिली गेली पाहिजे. पक्ष कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केले पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या क्षेत्रातील ऊर्जा टिकवली पाहिजे.
वर्धा येथील होऊ घातलेल्या 8 आणि 9 जुलै 2024 रोजी भारत जोडो अभिमान अंतर्गत देशपातळीवरील कार्यकर्ते मेळाव्यात सहभागी होऊन पक्षाची मांडणी अजून कशाप्रकारे चांगली करता येईल हे विचार सोबत घेऊन आपल्या मतदारसंघात एक नवीन चेहऱ्याला संधी देऊन आपण मोट बांधली पाहिजे आणि पुढच्या काळात लोकसभे प्रमाणे जिंकणारी फळी निर्माण व्हावी. भविष्यात एक मोठे राज्यस्तरीय संमेलन व्हावे आणि त्यात पक्षाच्या जाहीरनामा असावा अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांची होती आणि ती मी पुढे रेटून धरेल असे त्यांनी स्पष्ट केले.
अविनाश पाटील यांनी विचार मांडताना महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या कार्यकाल ऑक्टोबर मध्ये संपत असून पुढे होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी आपल्याला कामाला लागले पाहिजे आपल्याला वेळ कमी असून या काळात आपण काय काय करावे, पक्ष बांधणी कशी करावी आपले विचार जनतेसमोर प्रकरणी कसे मांडता येतील याबद्दल मार्गदर्शन केले. प्रा.अशोक पवार यांनी भारत जोडो अभियानाच्या निर्भय बनो अभियान माध्यमातून आम्ही लोकसभा निवडणुका आधी आणि लोकसभा निवडणुकी दरम्यान अभियान कसे राबवले याबद्दल सविस्तर माहिती दिली व त्याची गरज पुढे विधानसभेसाठी कशी आहे हे पटवून सांगितले.
कार्यक्रमाचे आयोजक विधानसभेचे भावी उमेदवार संदीपराजे घोरपडे यांनी सामाजिक संघटना, राजकीय संघटना बुथ, गाव, तालुका पातळी जिल्हा स्तरावर नियोजन झाले पाहिजे आणि राज्यस्तरावर भारत जोडो अभियानांतर्गत माणसांना सहभागी करून घेत युवा, शेतकरी, महिला यांच्यासमोर आपले पक्षाचे विचार मांडले पाहिजेत असे सांगितले. अमळनेर विधानसभेच्या समस्यांबाबत त्यांनी सांगितले की पाडळसरे धरण ही किती महत्त्वाचे आहे त्यामध्ये किती शेतकरी बांधव, समाज बांधव, युवा यांना रोजगार उपलब्ध होईल याविषयी मांडणी केली आणि विधासभेत वैचारिक भूमिका घेऊन मांडणी करणारे आमदार जायला हवेत लोकशाही च्या चारही स्तंभांसह पाचवा सामाजिक चळवळींचा स्तंभ जिवंत रहायला हवा असा सामान्य व्यक्ती आमदार म्हणून विधानसभेत दिसावा. अमळनेर विधानसभेला जो कलंक लागला आहे की पुन्हा- पुन्हा विकले जातात ते पुढे भविष्यात घडू नये या साठी विनंती केली की 'मी विधानसभा निवडणूक लढण्याचा निश्चय केला असून 'मला तुम्ही पाच वर्षासाठी दहा रुपयात आमदार म्हणून विकत घ्या' असे आवाहन केले. काँग्रेसमध्ये माझी 32 वर्षापासूनची कारकीर्द असून माझा जनसंपर्क आणि माझ्या शाळेचे केलेलं काम, नगरपालिकेतील केलेलं काम सामाजिक काम या गोष्टींचा विचार करत असताना मला काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी अशी मी पक्षाला मागणी करतो आणि महाविकास आघाडी ने याबाबत सर्वांगीण विचार करावा असा आग्रह धरला.
या मेळाव्यात खलील देशमुख (पाचोरा), जयसिंग वाघ (जळगाव). श्याम पाटील, भाऊसाहेब देशमुख ,भागवत गुरुजी, रचना अडसुडे (नंदुरबार), चुनीलाल भाऊ (नंदुरबार) गणेश पाडवी, रंजनाताई, नितीन बागुल, मगन भाऊसाहेब. इत्यादी सामाजिक कार्यकर्त्यांनी विचार मांडले. प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी तर आभार संदीप घोरपडे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व स्तरावरील सामाजिक कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments