कोळी समाजाचा अमळनेर प्रांत कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा !

अन्याया विरुद्ध असंतोष! प्राणांतिक उपोषणाची देखील तयारी!! 
टोकरे कोळी तथा ST संवर्गाचे प्रमाणपत्र प्रश्न प्रलंबित असल्याबद्दल आदिवासी कोळी समाजात मोठी नाराजी आहे. त्या साठी 1 जुलै 24 रोजी सकाळी 11 वाजता अमळनेर येथील तिरंगा चौकातून चोपडा व अमळनेर येथील आदिवासी कोळी बांधवांचा बिऱ्हाड मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकणार आहे.
वेळोवेळी सुनावणी, तपासणी झाली, सर्व सबळ पुरावे जोडले तरी देखील आदिवादी कोळी समाजावर अन्याय होत असल्याने सदर मोर्चा व प्राणांतिक उपोषणाची गरज पडली असल्याचे समाजाच्या नेत्यांनी लोकहितवादीशी बोलताना सांगितले. 
जगन्नाथ बाविस्कर, मधुकर सोनवणे, कैलास बाविस्कर, हिलाल सैंदाने, रामचंद्र सपकाळे, गोपिचंद्र कोळी, सुकदेव सोनावणे, चंद्रशेखर सूर्यवंशी, प्रवीण कोळी, भूषण कोळी, गणेश बाविस्कर, हिरामण कोळी,  गोपाळ देवराज, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, भीमराव कोळी, प्रदीप लोहारे, वासुदेव लोहारे, वसंत कोळी, राकेश कोळी, विक्रम शिरसाठ, सागर सोनवणे, विश्राम कोळी, लोटन कोळी, पवन कोळी, चंद्रशेखर कोळी, आदीसह महिला व युवक या मोर्चाचे नेतृत्व करणार असून आदिवासी कोळी बांधवांनी या मोर्चात सहभाग द्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments