आधी केले मग सांगितले ही उक्ती सार्थ ठरली!!
धरणगाव अमळनेर रस्ता व धरणगाव अमळनेर रस्त्यावर चांदणी कुर्हे गावाजवळ बोगद्यात पाणी साचून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. तातडीच्या कामासाठी जळगाव जाणे अवघड झाले आहे. त्या मुळे संतप्त नागरिक लोकप्रतिनिधींना शिव्यांची लाखोली वाहत आहेत.
दूरदृष्टी असलेले कृषिभूषण साहेबरावदादा पाटील यांनी या प्रश्नी सतत पाठपुरावा करून दोन्ही उड्डाणपूल मंजूर करून आणले होते परंतु नंतरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने बोगदे काढण्यात आले. जे पाऊस पडताच पाण्याने भरतात व लोकांचे हाल होतात, त्यामुळे आज कृषिभूषण पाटील यांची जनतेला तीव्र आठवण होत आहे.
बोरी नदी काठचे रस्ते, पूल, शहराची वाहतूक कोंडी सोडविणारे व शहर सुशोभीत करणारे दूरदृष्टी असलेले असे दादा एकमेव आहेत, ज्यांनी सत्तेत असो वा नसो कागदपत्रे देत शासनाला अनेक कामे करायला भाग पाडले व आधी केले मग सांगितले हे ब्रीद स्वतःच्या नावा पुढे लावून घेतले.
नुकताच विद्यार्थी परीक्षा शुल्क विषय देखील त्यांनी उचलून धरला. त्याचा लाभ राज्यभरातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.
दादा, तुसी ग्रेट हो असे कृषिभूषण साहेबरावदादा मित्र परिवाराने लोकहितवादीशी बोलतांना सांगितले.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments