बांबरुड प्र. ब. पोस्ट गोंडगाव ता. भडगांव जिल्हा जळगांव येथे काही शिकारी वटवाघूळ पकडण्यासाठी दिवसाआड येतात, जाळे टाकतात.. त्या मुळे अन्य पक्षी देखील जाळ्यात अडकतात व पर्यावरणाचे न भरून निघणारे नुकसान होते.
वटवाघूळ शिकार केवळ अंधश्रद्धेतून होत आहे, वटवाघूळाचे नखं, दात व खोपडी अघोरी कामा साठी, धन शोध, पुत्रप्राप्ती, दुश्मन संपविणे, राजकीय वा अन्य यश प्राप्त करणे आदी कामासाठी वापर होत असल्याची माहिती आहे. केवळ गैरसमज म्हणून ही बुवाबाजी केली जाते. व त्या कारणे लाखोंचा फायदा होतो म्हणून काही शिकारी वटवाघूळ पकडून तस्करी करीत आहेत.
वनविभाग, पोलीस, पत्रकार व गावा गावातील लोकांनी ही अघोरी कारणाने होणारी प्राणी हत्या रोखून शिकारी लोकांना जेरबंद करावे असे आवाहन करीत आहोत. कोणत्याही पक्षी व प्राण्यांची तस्करी हा अजामीनपात्र अपराध असल्याने सर्वांनी सामूहिक पुढाकार घ्यावा ही विनंती.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments