एका पक्षा कडून डझनभर उमेदवार तयारी करताना दिसत आहेत. 3+3 सहा पक्षांची युती आहे, त्यांत महायुती कडून सिटिंग आमदार म्हणून अनिल भाईदास पाटील नक्की ठरतील हे राजकीय संकेत आहेत तर महा'आघाडी' कडून देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा निश्चित आहे!
शिरीष चौधरी यांनी अपक्ष लढेल अशी घोषणा केली आहे, अनिल पाटील निश्चित आहेत.. मग काँग्रेस कडून अनेकांनी पत्रकबाजी सुरू करून अनेकांनी तयारी चालविली आहे तशी शरद पवार गटा कडून देखील अर्धा डझन उमेदवार पत्रक हलवीत असल्याचे दिसत आहे! उबाठा कडून देखील अनेकांनी काठी टेकत 'कंबर' कसली आहे.
शिरीषदादा चौधरी व अनिलदादा यांचा स्पष्ट अजेंडा असल्यावर अमळनेर विधानसभेची जागा (युती टिकल्यास) शरद पवार गटाला जाणार हे नक्की.. मग काँग्रेसचे अनेक नेते का बाशिंग बांधून फिरत आहेत? शरद पवार गटा कडून डझनभर उमेदवार का पायपीट करीत आहेत? उबाठा कडून देखील अनेकांनी दावा सांगत झोपेतून जागे झाल्या सारखे लोक संपर्क वाढविले आहेत.
काही अपक्ष देखील 'नकली नो.. सॉरी मुखवटे' घेऊन फिरत आहेत!
अर्थ एकच की जो तो आपापली मार्केट व्हॅल्यू वाढविण्याचा प्रयत्न करीत आहे.
निवडणूक जिकण्यासाठी सक्षम फक्त 2-3 उमेदवार आहेत व ते आर्थिक समर्थ आहेत.. त्यांनी आपले पाय धरावे व मोठे पॅकेज द्यावे असा हेतू असू शकतो, आज लाख दोन लाख खर्च केला तर भविष्यात 'काही अन्य पदरात पाडून घेता येईल' असा हेतू तर नाही ना? अशी शंका व्यक्त होत आहे.
खरे तर त्याच हेतूने आपली मार्केट व्हॅल्यू वाढविणे साठी ही प्रपोगेंडा कॅंपनिंग सुरू असल्याचे दिसत आहे.
फलक, पत्रक, किरकोळ कार्यक्रम राबवून आपली ताकद आहे हे दाखवायचे, आयत्या वेळी 'इकडे की तिकडे' कुठेही 'मोठे पॅकेज पदरी पाडुन घ्यायचे' हेच धोरण या प्रसिद्धी तंत्रा मागे असल्याचे राजकीय जानकारांचे मत आहे!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments