अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील सुपुत्र वासुदेव देसले यांना उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर बढती मिळाली असून ते नासिक पेठ (त्रंबकेश्वर) विभागात रुजू झाले आहेत.
अत्यंत संवेदनशील व्यक्तिमत्त्व परंतु करड्या शिस्तीचे म्हणून ओळख असलेले वासुदेव देसले हे नंदुरबार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना त्यांचे बढतीचा संदेश आला.
दहिवद येथील प्रथम लोकनियुक्त सरपंच सुषमाताई देसले यांचे ते पती असून सुषमाताई यांनी देखील राजकीय व सामाजिक क्षेत्रात मोठी छाप सोडली आहे.
वासुदेव देसले यांचे पदोन्नती बद्दल
दहिवद ग्रामस्थ, अमळनेर पंचक्रोशीतील सर्व राजकीय सामाजिक क्षेत्रातील लोकांनी अभिनंदन केले.
आमचे साहेब मोठ्या पदावर गेले म्हणून सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
देसले साहेब, आपले हातून अधिकाधिक जनसेवा घडो या लोकहितवादी परिवाराच्या सदिच्छा!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

0 Comments