रुग्ण सेवेला अग्रक्रम! आम्ही देव नसून देवदूत आहोत-डॉ प्रशांतदादा शिंदे

आय. एम.ए. अमळनेर अध्यक्ष म्हणून वैद्यकीय सेवेसह जनतेचे हितरक्षण करणार! 

इंडियन मेडिकल असोसीएशन अमळनेर अध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी स्वीकारली असून त्या पदास न्याय देण्याची जबाबदारी समर्थपणे पेलेल असा विश्वास डॉ प्रशांत शिंदे यांनी दिला आहे. 
अकारण वा गैरसमजातून डॉक्टर वा दवाखान्यावर हल्ला करणाऱ्या लोकांनी डॉक्टर हे देव नसून देवदूत आहेत हे समजून घेतले पाहिजे. रुग्णसेवा देताना नागरिकांच्या वेदना कमी व्हायला हव्यात त्यांचे प्राण रक्षण व्हावे हा प्रयत्न कोणताही डॉक्टर करतो हे सर्वानी समजून घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. 
रुग्णसेवा हा आमचा अग्रक्रम असला तरी आमच्या मर्यादा देखील समजून घेत आम्हाला देखील कुटुंब व वैयक्तिक आयुष्य आहे हे ध्यानात घ्यावे असे भावनिक आवाहन डॉ प्रशांत शिंदे यांनी केले आहे. 
अकारण डॉक्टर वा दवाखान्यावर होणारे हल्ले खपवून घेणार नाही अशी तंबी देत त्यांनी सर्वांच्या शुभेच्छा पाठीशी असू द्याव्या अशी विनंती केली आहे. 
सर्वानी प्रेमपूर्वक दिलेल्या शुभेच्छा माझी जबाबदारी वाढविण्यासाठी कामी येतील हे त्यांनी नम्रपणे नमूद केले, 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments