अमळनेर येथील तिरंगा चौकातील श्रीनंदा किराणाचे नावरकर परिवार शाडू मातीचा गणपती स्थापन करतात व त्याचे विसर्जन अंगणातच शुद्ध पाण्याच्या छोट्या हौदात करतात.. अंगणात सडा- सारवण करून सुरेख रांगोळी काढून फुलांची आरास केली जाते, ज्या पाण्याच्या हौदात गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते त्यास देखील पुष्प माळांनी सजविलेले जाते.
सायंकाळी परिवारातील सर्व सदस्य व नातलग, मित्रगण यांचे साक्षीने गणरायास पुढील वर्षी या असे निमंत्रण देत विधीवत निरोप दिला जातो. आरती व टाळ्यांचा गजर या शिवाय वाद्य, गुलाल, फटाके असा कोणताही प्रकार नसतो. प्रसाद वाटून सर्वाना प्रसन्न मुद्रेने नावरकर परिवारातील सदस्य भेटतात.
हे पाणी नंतर तुळस व फुलझाडांना टाकण्यात येते. शक्ती बुद्धीची देवता असलेल्या गणरायास अत्यन्त आदर्श पध्दतीने निरोप देण्याची परंपरा नावरकर परिवार अनेक वर्षे जपून आहे.
सर्वानी त्यांचे अनुकरण करायला हवे.
ध्वनी प्रदूषण टाळून झालेल्या नावरकर बंधु यांचेकडील या पर्यावरणपूरक विसर्जनास गणेश निंबा नावरकर, राजेंद्र निंबा नावरकर, संजय निंबा नावरकर, सुहास देशमुख पिंटू जैन, बंडू जैन, बिपिन जैन, शीतल कोठारी, राजेश जैन, सुवर्णा चौधरी, सोनाली देशमुख, रोहिणी देशमुख, सुशिलाबाई नावरकर, रेखा नावरकर, सीमा नावरकर, अक्षता नावरकर, आकाश नावरकर, हर्षल नावरकर, ओम नावरकर, यश नावरकर आदी उपस्थित होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments