शेतकरी हिताच्या आंदोलनात श्रेया वरून पेटली! आयोजकांचे ताट तिसऱ्यांनेच पळविले?

काल अमळनेर तहसीलदार कार्यालया समोर दुष्काळ जाहीर करा म्हणत शेतकरी हितासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. 
या आंदोलनास बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.. यात ज्यांचे सोबत 50 लोक देखील नसूनही आमदार बनू इच्छिणाऱ्या नेत्यांची नेतेगीरी मात्र चमकदार ठरली!
यातही ज्यांनी स्वतःचे दारात कधी 5/25 लोकांना चहापाणी देखील केली नाही त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या ओढत या आंदोलनाचे समारोपा पूर्वीच स्वतःचे नावाने बातत्म्या करून नागोबा बनण्याचे काम मात्र चोख केले! 
मुख्य आयोजक कोण? संघटन कुणाचे? खर्च कोण करतो? परिश्रम कोण करतोय? याचे भान न ठेवता कुणाच्याही मंचावर धडकायचे आणि भाषण ठोकून फुकटात आपल्या संघटनेचे नाव देऊन प्रसिद्धी मिळवायची हे चुकीचे आहे... असा आरोप शेतकरी हितासाठी लढणारे माजी नगरसेवक श्याम पाटील यांचे समर्थकांनी केला आहे,. 
ज्याचे श्रेय त्यास द्यायला हवे हे आमचे देखील म्हणणे आहेच! असे आयत्या बिळावर नागोबा होणारे कुणीही असले तरी आमचा विरोध राहीलच! 
थोडक्यात काल कमी प्रतिसाद असला तरी जे काही लोक जमले त्याचे श्रेय माजी नगरसेवक श्याम पाटील यांनाच दिले पाहिजे! असे पंचक्रोशीतील जनता ओरडून सांगत आहे. तशा प्रतिक्रिया त्यांनी आमचेकडे दिल्या आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments