अमळनेर बोरी पूल (फरशी रोड) येथे दोन्ही बाजूने सफरचंद, लसूण, कांदे, नारळाच्या गाड्या उभ्या आहेत,
स्पीकर लावून विक्री सुरू असल्याने प्रवासी या आकर्षक आवाहनास बळी पडून अचानक थांबतात.. गर्दी होते,.. !
अरेरावी होते, वाद व अपघात होतात,. या कडे नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग वा पोलिसांचे लक्ष नाही.
मुख्याधिकारी नेरकर वा सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावर व्यापारी संकुल उभारले तर किती उत्तम होईल?
शासनास महसूल मिळत जाईल व व्यावसायिक लोकांना हक्काचा रोजगार देखील मिळेल!
तसे शक्य नसेल तर काढा ही रस्ता अडविणारी दुकाने.
अशी मागणी जनमानसातून होत आहे.
अनेकांच्या तक्रारी असल्याने परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने निवारण केले पाहिजे!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments