राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे इच्छुक उमेदवार माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी श्याम पाटील, निकम व तिलोत्तमा पाटील यांना जाहीर पाठिंबा दिल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या नंतर कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे समर्थकांनी राजवड गाठून दादांना जवळपास घेराव घालून तिकीट मिळाले नाही तरी चालेल पण तुम्हीच उभे रहा म्हणून हट्ट धरला.
लोकग्रहास्तव कृषिभूषण साहेबराव पाटील यांना अपक्ष का असेना उमेदवारी करावीच असा आग्रह धरून जनता हट्टास पेटली असताना ते काय निर्णय घेतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
या साठी उद्या सकाळी अमळनेर येथे मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
एकूणच कृषिभूषण पाटील हेच उमेदवार व आमदार हवेत असा त्यांचे समर्थकांनी दावा सांगितला असून असे घडले तर माजी मंत्री अनिल पाटील यांना तो जबर धक्का असेल.
तसेच साहेबराव पाटील यांनी ज्यांना पाठिंबा दिला त्या लोकांना ते यु टर्न घेऊन वाऱ्यावर सोडतील की सोबत घेऊन मोट बांधतील? हा कळीचा मुद्दा आहे!
तूर्तास कृषिभूषण यांचे मन वळविण्यात त्यांचे कार्यकर्ते/समर्थक यशस्वी होतात का हे लवकरच समजेल!
शाम पाटील, तिलोत्तमा पाटील व निकम यांचेशी संपर्क केला असता ते नॉट रीचेबल होते.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments