निलगाय ला बेकायदा कैद करणाऱ्या भरुचावर गुन्हा दाखल होणार का?

 
फॉरेस्ट ऑफिसर या श्रीमंत दारुवाल्याचे लाभार्थी तर नाहीत ना? 
पळासदळे शिवारात नवलसिंग भरुचा यांचे फार्म हाऊस मध्ये दुर्मिळ होत चाललेली नीलगाय अनेक वर्षे बंदिस्त करून ठेवण्यात आल्याची खबर सर्पमित्र गणेश शिंगारे यांना मिळाली
त्यांनी या दुर्मिळ व बेकायदेशीर कैद केलेल्या निलगायला मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले असता त्यांनी वन विभागास 'आवतन' धाडले! 
या वेळी दुचाकी घेऊन वनाधिकारी आले पण त्यांनी बेकायदेशीर कैद केलेल्या नीलगाय ला मुक्त करण्यासाठी मोठे वाहन तर आणले नाहीच पण वरून सर्पमित्र पर्यावरण मित्र गणेश शिंगारे यांनाच दमदाटी केली. 
आम्हास वृत्त मिळताच आम्ही वनाधिकारी सोनवणे यांचेशी संपर्क साधून गणेश शिंगारे यांची बाजू घेतली व भरुचा यांचे वर गुन्हा दाखल करा असा आग्रह धरला. 
अद्याप वनबिभागाने कोणतीही दखल घेतली नाही, 
सविस्तर वृत्त उद्या! 
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972871440

Post a Comment

0 Comments