त्वचारोग, नेत्र वा फुफ्फुसा साठी धूप वा कोणताही धूर घातकच !!

धूर गो धनाचा असो की कोणताही, जीवघेणाच!!!
स्मोकिंग मुळे फुफ्फुस निकामी होतात हे शास्त्रीय सत्य आहे. 
तसेच आयुर्वेदिक वा गाईच्या शेणा पासून ते विविध वनस्पती वापरून शुद्ध धूप पूजेसाठी वापरला तर आरोग्यासाठी चांगला असतो असे सांगितले जाते, अगदी लोभान देखील!
वैद्यकीय शास्त्र या बाबीचे खंडन करते, कारण कोणताही धूर हा आरोग्यासाठी घातकच आहे,
या पेक्षा घातक गोष्ट म्हणजे ज्यांना त्वचा रोग, सोरायसिस, खरूज, इसब असे गंभीर त्वचारोग आहेत त्यांना श्वासा द्वारे शरीरात जाणारा धूर अति घातक असल्याचे समोर आले आहे.
सिगारेट, विडी, धूप, अगरबत्ती असा कोणताही धूर फुफ्फुस निकामी करतोच पण त्वचा रोगात तो कोणत्याही औषधास प्रतिसाद देऊ देत नाही.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे चुरचूरतात, डोळ्यांचे आरोग्य बिघडते, हृदयविकार बळावतो, आणि मेंदूला ताण पडून अल्झायमर (विस्मरण) ही व्याधी जडण्याची शक्यता अधिक असते,
एक वेळा 10 मिनिटे लावलेला कोणताही धूप हा 10 सिगारेट ओढण्या बरोबर असतो.
कारणे धूप, अगरबत्ती वा चुली पासून लांब राहावे..
देवाची उपासना करतांना एखादी कापूर वडी लावणे हा सोपा पर्याय आहे.
पण, धूप/अगरबत्ती/ वा कोणताही धूर फायदा देण्या ऐवजी घातक असतो हे शास्त्र सांगते.
पटले तर विचार करा.
जे सतत अशा धुपात राहतात वा स्मोकिंग करतात त्यांना अनेक व्याधी असतात.. सदैव दवाखान्यात जातात हे जाणून घ्या.
अनुभव हीच खात्री.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments