बिगर मोसमी फळं आरोग्यास घातकच, सिझनेबल फळ- भाज्या हितकारक

आंबा, टरबूज, खरबूज आदी फळे वा अनेक भाज्या अकाली खाऊ नयेत, त्या मुळे चयापचय प्रक्रिया बिघडते.
निसर्गाच्या रचना प्रदूषण व मानवाच्या स्वार्थी वर्तना मुळे बदलत असली तरी अद्यापही सिझना नुसारच अनेक फळ भाज्या उपलब्ध होतात. 
पेरू केळी आदी फळे हिवाळ्यात येतात व ते खाल्याने सर्दी होते हा अपसमज आहे. अशी फळे याच काळात का येतात? याचा विचार केला पाहिजे. प्रकृतीच्या रचनेनुसार आलेल्या कोणत्याही भाज्या व फळे उपकारकच असतात. 
तुम्ही अस्वच्छ व किडके सडके खाल्ले तर मात्र त्रास होणारच. 
कृत्रिम रित्या पिकविलेल्या फळांचा घातक परिणाम होतो तसा बिगर मोसमी फळे खाल्याने देखील वाईट परिणाम होतो. 
अँटीबॉडी तयार करण्यासाठी एक छान प्रयोग सांगितला गेला आहे, स्वच्छ चांगला पेरू वा केळी खाल्याने सर्दी झाली तर पुन्हा तेच फळ पुन्हा खा.. अँटीबॉडी तयार होईल,  लस अशाच प्रकारे अवतरली, आणि होमिओपॅथी याच सूत्राने काम करते असे अभ्यासक सांगतात. 
ताज्या व चांगल्या हिरव्या, लाल, पिवळ्या पाले, फळभाज्या , पालेभाज्या व फळे नियमित सेवन केल्यास झाला तर फायदाच होईल.  
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments