पडत्या काळात अजित दादा यांची साथ सोडून शरद पवार राष्ट्रवादीचे तिकीट घेणारे गुलाबराव देवकर आता अजित पवार यांची गाडी चालू होताच जागा मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत.
परंतु स्थानिक नेते व कार्यकर्ते एकवटले असून चालू गाडीत या विना तिकीट प्रवाशाला बसू देऊ नये म्हणून जोरदार विरोध करताना दिसत आहेत,.
सुरेश जैन यांनी वाढविलेला हा माणूस नेहमी चालू गाडीत बसतो, मेलकुली, ठेकेदार, मजूर फेडरेशन, आमदार ते थेट पालकमंत्री झालेल्या गुलाबराव देवकर यांनी पडत्या काळात अजित दादा यांना सोडले, पण शरद पवार यांची गाडी बंद पडताच चालू गाडीत बसण्याचा त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी धरणगाव एरं'डोल व जिल्ह्यातील अजित पवार समर्थक एकवटले असल्याने
'कहानीमे-ट्विस्ट' आला आहे!
अजितदादा पवार या विना तिकीट प्रवाशाला ऍडजस्ट करून घेण्याचा आदेश देतील का?
जिल्हाध्यक्ष संजय पवार यांची गुलाबराव देवकर यांचे बद्दल काय भूमिका राहील?
स्थानिक नेते व कार्यकर्ते माघार घेतील की विरोधात कायम उभे राहतील? याचे उत्तर येणाऱ्या काळात मिळेल.
शिक्षण संस्था, ठेकेदारी, व आपला आर्थिक प्रपंच, वारसदारी टिकविण्यासाठी देवकारांना सत्तेची मदत हवी असून त्या साठी त्यांचा आटापिटा सुरू असल्याचे आरोप होत आहेत.
सर्वात मोठे नुकसान संजय पवार यांचे सह अनेकांचे राजकीय अस्तित्वाला असणार हे नक्की म्हणून चालू गाडीत विनाटिकीट देवकारांना विरोध होत असल्याने आता तरी दिसत आहे.
सूत्र व पदाधिकारी यांचे लोकहितवादीशी झालेल्या सवांद व प्रतिक्रिया यावरून आम्ही हा संशय व्यक्त करीत आहोत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440



0 Comments