900 ते 1200 रुपये किलो भावात विकली जाणारी काजू कतली आपण आवडीने खातो पण यात काजू किती असतात? साखर किती असते?
काजूचे नगण्य प्रमाण व शेंगदाणा बारीक दळून काजू कतली बनवली जाते.
अन्य भेसळ देखील होतेच.
याचा अर्थ आपण भेसळ युक्त काजू कतली थेट 900 ते 1200 रुपये भावात विकत घेऊन फसत आहोत.
अमळनेर शहरात देखील अशी फसवणूक सुरू असून (त्याचा भांडाफोड करणार नक्की!) राज्य व देशातील अनेक मिठाई विक्रेते असा गोरख धंदा करून मालामाल होताना दिसत आहेत.
ग्राहकांनी विश्वासु व्यावसायिका कडुनच वस्तू विकत घ्याव्या किंवा काजू कतली घरीच बनविणे शिकून घ्यावे. सोपी रेसिपी आहे.
जरूर ट्राय करा.
शेंगदाणा पेस्ट टाकून बनविलेली काजू कतली कशी ओळखायची,? अशी भेसळ युक्त काजू कतली, पनीर, वा अन्य पदार्थ मिळाले तर तक्रार कुठे व कशी करायची? तक्रार दिल्यावर देखील कारवाई न करणाऱ्या अधिकारी वर्गाच्या 'G' मध्ये काजू टाकून त्यांचे लक्ष कसे वेधायचे? या बाबत नंतरच्या एपिसोड मध्ये लिहिणार आहोतच!
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापु सोनार
7972881440



0 Comments