अनिल भाईदास पाटील थेट दुसऱ्या वेळी कॅबिनेट मंत्री होतील ही अटकळ खोटी ठरली.
आज नागपुरात अनिल पाटील मंत्रीपदाची शपथ घेतील म्हणून सूत्रांची माहिती खोटी ठरली.
उत्तर महाराष्ट्रातून एकमेव अजित पवारांचे आमदार असलेले अनिलदादा हे थेट पुन्हा कॅबिनेट मंत्री होतील असा दावा राष्ट्रवादी परिवाराकडून केला जात होता पण केवळ प्रतोद म्हणून नेमणूक करून अनिलदादा यांची बोळवण करण्यात आल्याचे सध्या तरी दिसत आहे.
आणखी 4 मंत्री भविष्यात होऊ शकतात त्यात त्यांचा नंबर लागू शकतो किंवा राज्याचे राजकारणात नवे वादळ ऊभे राहू शकते कारण जेष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनाही अजित पवार यांनी स्थान दिलेले नाही.
भुजबळ यांना प्रदेश अध्यक्ष करून अनिल पाटील यांना दुसरा लाडू तर देण्यात आला नाही ना? की भुजबळसाहेबाना नारळ द्यायची तयारी आहे? या बाबतीत साशंकता आहे.
तूर्तास समर्थकांचे फटाके रद्दीत गेले आहेत.
अनिलदादा यांना मंत्रीपद मिळाले नाही म्हणून अमळनेर मतदार संघात नाराजी आहे.
आतिषबाजी करायच्या तयारीत असलेल्या कार्यकर्ते हातात माचीस घेऊन दारात, चौकात लडी लाऊन उभे होते.. व अनेक तर कुडकुडत नागपुरात पोचले होते.. अशा अनेकांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे.
अनेकांनी घेतलेले फटाके तूर्तास तरी रद्दीत गेले आहेत. भविष्यात मोठी जबाबदारी मीळु शकते असे सांगितले जात आहे.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments