अमळनेर मुख्याधिकारीच गुंडाना सामील? राधेश्याम अग्रवाल यांचा संशय!!

अमळनेर शहरातील कोंबडी बाजार भागात साळुंके बंधूनी न प अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांना मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, सरकारी कामात अडथळा आणला या बद्दल पोलिसात दाखल तक्रार मागे घ्यावी म्हणून चक्क  मुख्याधिकारीच दबाव आणत असल्याची माहिती राधेश्याम अग्रवाल यांनी प्रसिद्धी माध्यमास दिली आहे. 
मुख्याधिकारी व साळुंके परीवार यांची सेटलमेंट झाल्याने हे घडले की राजकीय पुढारीने हस्तक्षेप करून मुख्याधिकारी यांना मॅनेज केले? या बाबत शंका व्यक्त होत आहे. 

राधेश्याम अग्रवाल सरकारी नियमानुसार काम करत असताना त्यांना मारहाण होते अशा वेळी त्यांची बाजू घेणे आवश्यक असताना तक्रार मागे घ्या असा आग्रह मुख्याधिकारी का धरतात? 
कुणाचा दबाव आहे की हात ओले झाले आहेत याची वरिष्ठ अधिकारींनी चौकशी करावी, सत्य आढळले तर थेट मुख्याधिकारी विरुद्ध गुन्हा दाखल करावा अशी मागणी होत आहे. 
राधेश्याम अग्रवाल यांचे म्हणणे खरे असेल तर मुख्याधिकारी नालायक आहे असे सिद्ध होईल. कारण न प आदेशानुसार काम करणारा कर्मचारी गोत्यात आला असतानाही हा अधिकारी बाजू घेत नाही हे गंभीर आहे. 
मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा.
-लोकहितवादी पत्रकार 
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments