चौधरी बंधू या पुढे कोणत्याही निवडणूकीत उभे राहणार नाही? अफवा की वास्तव?

असे म्हणतात की अबुच्या शेतात कार्यकर्ते ढसाढसा रडले!
अमळनेर विधानसभा निवडणूक विश्लेषण भाग-४ 
कुणाचे हृदयपूर्वक तर कुणाचे मगराचे अश्रू!
प्रामाणिक काम व परिश्रम करुन देखील निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्या नंतर अबू च्या शेतात शिरिषदादा चौधरी व बापूसाहेब यांच्या सहकारी- मित्र परिवाराची 'सांत्वन पार्टी' झाली. अनेकांना टाळण्यात आले हे अलाहिदा!!
पण, या पार्टीत पराभवाच्या कारणांची चर्चा सुरू असताना चांगले काम करून देखील पराभव स्वीकारावा लागतो असे सांगून या पुढे एकही निवडणूक लढणार नाही असे दादा व बापू यांचे वतीने सांगताच अनेकांनी अश्रूंना वाट मोकळी करीत ढसाढसा रडले. 
यातील अनेकांचे खरेच प्रेम असल्याने हृदयपूर्वक तर काहींचे मात्र मगराचे अश्रू होते असे प्रत्यक्षदर्शी सूत्रांनी सांगीतले. 
रोज शिरिषदादा व बापूंचे खायचे व रात्री-अपरात्री दुसऱ्या दादांचे पंगतीत ग्लास रिचवायचे.. असे धोरण असलेले काही या श्रमपरीहार 'पार्टीत' उपस्थित होते व तेच जास्त रडत होते असेही फोटो व व्हिडीओ व ऑडीओ उपलब्ध झाले आहेत. 
बापूसाहेब रविंद्र चौधरी व शिरिषदादा यांनी निराश न होता पुन्हा भरारी घ्यावी. पराभवाची कारणे तपासावी व नव्याने सुरुवात करावी. 
एक दोन नव्हे तर 4 वेळा पराभूत झालेले लोक थेट मुख्यमंत्री वा प्रधानमंत्री झाल्याचा भारतीय इतिहास असताना दुसऱ्या पराभवाने मान टाकून चालणार नाही असा हितचिंतक म्हणून आमचा वैयक्तिक सल्ला! 
जे मगराचे अश्रू ढाळत होते त्यांना बाजूला करा.. जे खरोखर सोबत होते व राहतील त्यांचे सह नवीन दमाचे लोक जवळ करा व पुन्हा घ्या फिनिक्स भरारी. 
तुम्ही ज्यांना नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, वा अनेक मोठया पदावर बसविले तेच साथ सोडून का गेले? 
ज्यांच्या 4 पिढ्या बसून खातील असे लाईफटाइम कल्याण करून दिले त्यानी या निवडणुकीत दुसऱ्या पंगतीत बसत 'जय श्रीराम' करीत ग्लास का रिचविले? 
हा विचार करणार नसाल तर मात्र तुमचा खरोखर राजकीय पराभव मान्य करावा लागेल. 
म्हणून बापूसाहेब व दादासाहेब  पुन्हा उभे रहा खंबीरपणे व म्हणा....
'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली!' 
जे गद्दार निघाले य्यांना सोडायला हवे पण जे गेली 10 ते 15 वर्ष निष्ठा ठेवून आपले सोबत होते त्यांना वाऱ्यावर सोडणार का? असा सवाल शिरीषदादा मित्र परिवारातील एका नेत्याने लोकहितवादीशी बोलताना उपस्थित केला.
●उद्या● 
अनिलदादा दुसऱ्यांदा मंत्रीपदाच्या उंबरठ्यावर? कारण मीमांसा.
अमळनेर निवडणूक विश्लेषण भाग -५
 
*बातमीत प्रसिद्ध फोटो अनेकदा प्रतिकात्मक असतात याची नोंद असू द्यावी. 
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार 
7972881440

Post a Comment

0 Comments