अमळनेरात चौधरी बंधूसोबत राहूनही 'ते' विरोधी उमेदवाराचे दिमतीला होते?

शिरिषदादा यांनाही धोका देणारे त्यांनी पोसलेले नेते/कार्यकर्तेच होते का?
निवडणूक विश्लेषण भाग-३
दिवसा बापू/दादा सोबत राहून परस्पर मात्र  'रात्रीस खेळ चाले' दुसऱ्या गटात सेटिंग? ही परिस्थिती अनेकांनी पाहिली!
बापू व शिरिषदादांचे पत्रकारांकडे दुर्लक्ष देखील नडलेच! नाहीतर ही खबर तेंव्हाच त्यांना मिळाली असती.
खरे तर 'राजकारण' म्हटले की 'कुणी कुणाचे कधी सोबत?' याची खात्री देता येत नाही. 
पण अमळनेरचे माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी ज्यांना पोसले, वाढवले, गब्बर बनवले, पदे दिली पैसा दिला त्यातील अनेकांनी गद्दारी करून उघड उघड विरोध पत्करला तर त्यातील काहींनी सोबत राहून देखील 'दादांची दांडी उडेल' या साठी विरोधी उमेदवाराना छुपी मदत केल्याचा आरोप होत आहे.
यात तथ्य असो नसो पण सकाळी मुलगा एकीकडे तर बाप भलतीकडेच हे आम्हीच नाही तर अनेकांनी पाहिले आहे.
सत्तेत असताना ज्यांचे लाड पुरवले ते या लढाईत सोबत राहण्याचे नाटक करून 'एका दादांची धुलाई करून दुसऱ्या दादासाहेब यांचे कडून मलाई कमवित होते' हे जनतेने पाहिले आहे,.
एकूणच शिरिषदादा या वेळी फारच गाफील राहिले आणि 'घरका भेदी लंका ढाये' याची प्रचिती त्यांना आता तरी यावी.
अर्थात त्यांना या बाबत अद्याप पुरावे मिळाले नसतील तर त्यानी जरूर अभ्यास करावा. असा दावा देखील करण्यात आला आहे. 
निवडणूक काळात पत्रकार बांधव प्रचंड नाराज का होते? कारण, जे साडेचार वर्षे विरोधात होते त्यांना निवडणूक काळात जवळ घेऊन मोठी बिदागी दिली व जे कायम सोबत होते त्यांना वाटाण्याच्या अक्षता ही देखील अक्षम्य चूक झाली.
आणि विशेष म्हणजे ज्यांना पोसले, वाढविले, फिरविले, खाऊ घातले त्यातील काही अत्यन्त जवळील कार्यकर्ते/नेते रात्री वा भल्या पहाटे कुठे मिटिंग करीत होते?
या कडे डॉ बापू व शिरिषदादा यांचे झालेले गंभीर दुर्लक्ष देखील नुकसान करणारे ठरले,
अति विश्वास ज्यांच्यावर टाकला त्यांनीच दगा दिला नाही ना? याची तपासणी करायला हवी.
तटस्थ पत्रकार म्हणून हे लिहित असून खात्री करण्याची जबाबदारी बापू/ दादा यांची आहे.
बंटी-बबली स्टाईल धंदा करून कोणी 'जय श्रीराम' करीत घात केला याचे उत्तर 'चिखलात हात' घातल्या शिवाय कळणार नाही.
बीजे जिथे पेरली तीच 'मर' निघाली किंवा 'बांडगुळ' सिद्ध झाली असतील तर तुमच्या मशागतीला यश कसे येणार दादा?
जरूर अभ्यास करून येत्या न.प. /जी.प./प.स. निवडणूकिती अधिक काळजी घ्यावी असे शिरीषदादा यांचे गोटातील काही लोकांनीच आवाहन केले आहे.
ते दुखावले म्हणून खोटी माहिती देताहेत का? याची शक्यता नाकारता येत नाही पण खात्री करायला काय हरकत आहे? असे आमचे तुमचे प्रेमापोटी आवाहन. बापू व शिरिषदादा यांनी मैदान सोडू नये असे नम्र आवाहन! कारण प्रेम कायम आहे, राहील फक्त चुका दुरुस्त करायला हव्यात.  
जे खाल्या ताटास छेद करून गेले त्यांना कसे दूर ठेवायचे हे बापूसाहेब व दादा यांनीच ठरवावे.
अमळनेरातील कोणत्याही निवडणूका या पुढे लढणार नाहीत? अबू च्या शेतातील हे वृत्त सत्य आहे का?
* अमळनेर निवडणूक विश्लेषण भाग -४ उद्या.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापु सोनार
7972881440

Post a Comment

0 Comments