न प,मनपा निवडणूक मार्च एप्रिल ला होऊ शकते असे संकेत मिळताच अदृश्य झालेले हवशे नवशे गवशे जोरात नमस्कार घालायला लागले असून पार्ट्या, उत्सव, समारंभ जोरात सुरू झाले आहेत.
ज्याचा विसर पडला असे वाटते तो अचानक समोर येऊन पाय पडू लागला हे पाहून निवडणूक आली का? असा सवाल लोक विचारू लागले आहेत.
गल्लोगल्ली, सभा समारंभात रस्त्यावर जिथे तिथे वाकुन पाय पडणारे दिसत असल्याने नक्कीच न प निवडणूक लागणार आहे याचे संकेत मिळत आहेत.
आता एखाद्या शेंबड्याचे देखील फ्लेक्स लागतील व त्या खाली शुभेच्छा देणाऱ्या इच्छुक उमेदवारी करणाऱ्याचे मोठे फोटो लागतील.
एकूणच निवडणूक तयारीस
'हवशे नवशे-गवशे' लागले आहेत.
-लोकहितवादी पत्रकार
धनंजयबापू सोनार
7972881440


0 Comments